शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आयोलाल झुलेलालच्या जयघोषात चेट्रीचंड्र मिरवणूक

By admin | Updated: March 30, 2017 00:45 IST

नाशिक : सिंधी बांधवांचे नवीन वर्ष आणि भगवान झुलेलाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंधी समाज चेट्रीचंड्र उत्सव समितीतर्फे बुधवारी (दि. २९) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : सिंधी बांधवांचे नवीन वर्ष आणि भगवान झुलेलाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंधी समाज चेट्रीचंड्र उत्सव समितीतर्फे बुधवारी (दि. २९) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चेट्रीचंड्र जयंतीनिमित्त सारडा सर्कल येथील लोखंड बाजार येथून बाइक रॅली काढण्यात आली. फळ बाजार, शालिमार, कॅनडा कॉर्नर, कॉलेजरोड यामार्गाने निघालेल्या बाइक रॅलीची होलाराम कॉलनी येथे सांगता करण्यात आली. शालिमार चौकातून मिरवणुकीचेदेखील आयोजन करण्यात आले होते. चेट्रीचंड्र उत्सवानिमित्त शालिमार येथील भगवान झुलेलाल मंदिरात पारंपरिक पद्धतीने विजय सेतपाल महाराज, सूरज सेतपाल महाराज आणि सुनील शर्मा महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चित्ररथाचादेखील समावेश करण्यात आला होता.  दुपारी शालिमार येथून निधालेली मिरवणूक शिवाजीरोड, मेनरोड, रविवार कारंजा आणि मालेगाव स्टॅण्ड मार्गे रामकुंड परिसरात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. चेट्रीचंड्र ही वरुण देवता असल्याने यावर्षी सर्वत्र दमदार पाऊस व्हावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली. चेट्रीचंड्र महोत्सवात किशन अडवाणी, नानीकराम मदनानी, अशोक पंजाबी, राजू पंजाबी, जगदीश नंदवानी, श्याम पंजाबी, मुकेश वालेचा, हलपाल चेतवानी, मनीष तोलनी, जितू खेमानी, बिंदू खुबानी, कुणाल अजवाणी, दीपक पंजाबी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)नाशिकरोडला शोभायात्रानाशिकरोड परिसरात भगवान श्री झुलेलाल जयंती व सिंधी नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. सकाळी जेलरोड कलानगर येथील भगवान श्री झुलेलाल मंदिरात सकाळी सुरेश सुंदराणी, किशोर कारडा, लक्ष्मण कारडा यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. दुपारी दिमा भगवान यांचा सत्संग, भजन व सिंधी गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. युवकांनी नाशिकरोड भागातून भगवान श्री झुलेलाल की जय अशा घोषणा देत मोटारसायकल रॅली काढली होती. कलानगर येथील मंदिरापासून वाहनात भगवान श्री झुलेलाल यांच्या प्रतिमेची जेलरोड, बिटको, शिवाजी पुतळा, वास्को चौक मार्गे शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी राजन दलवाणी, नरेश कारडा, मनुशेठ जयसिंघानी, शंकर देवाणी, अशोक केसवाणी, दिलीप दासवाणी, नरेश गाराणी, गिरीश रामनाणी, भगवान कारडा, सोनू वेन्सानिया, वाल्मीक बागुल, दीपक वाणी, सुरेश आमेसर, दीपक देवाणी, दीपेश लखनानी आदि सहभागी झाले होते.