शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
3
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
4
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
5
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
6
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
7
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
8
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
9
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
10
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
11
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
12
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
13
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
14
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
15
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
16
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
17
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
18
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
19
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
20
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीच्या काही मतदारसंघांत बदल शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:52 IST

काँग्रेस व राष्टवादी राज्यात प्रत्येकी सव्वाशे जागा लढविणार असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. आघाडीच्या या जागावाटपात राज्यातील पाच ते  दहा विधानसभा मतदारसंघांत  बदल केले जातील. त्याबाबतचा निर्णय दोन्ही कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष घेतील,

नाशिक : काँग्रेस व राष्टवादी राज्यात प्रत्येकी सव्वाशे जागा लढविणार असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. आघाडीच्या या जागावाटपात राज्यातील पाच ते  दहा विधानसभा मतदारसंघांत  बदल केले जातील. त्याबाबतचा निर्णय दोन्ही कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष घेतील, असे सांगून राष्ट वादीचे अध्यक्ष शरद  पवार यांनी, आघाडीत महाराष्ट नवनिर्माण सेनेचा सहभाग राहणार नसल्याचे स्पष्ट केले. आगामी  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे सोमवारी नाशकात आगमन झाले.
विधानसभानिहाय पक्ष पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक येथे भेट झाल्यानंतर निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करेल, असा अंदाज आहे. त्यानंतर साधारणत: २५ ते ३० दिवसांच्या आत व दिवाळीपूर्वी निवडणुकीचा कार्यक्रम आटोपलेला असेल असे सांगून ही निवडणूक दोन्ही कॉँग्रेस व मित्रपक्षांनी एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी जागांचे वाटपही करण्यात आले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, पाच ते दहा मतदारसंघात बदल होतील व त्याबाबतचा निर्णय प्रदेशपातळीवर घेण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले. काही मतदारसंघांमध्ये दोन्ही काँग्रेसचे एकत्रित कॅम्पेनिंग करण्याबाबत नियोजन सुरू असून, प्रत्येक विभागाच्या मुख्यालयात संयुक्त सभा घेण्याचा प्रयत्न आहे. येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादीचा जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात येणार असून, राष्टÑवादी कॉँग्रेसने या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देऊन तरुण पिढीचे नेतृत्व उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही पवार यांनी दिली.
सध्याच्या पक्षांतराबाबत बोलताना पवार म्हणाले, जे आमचा पक्ष सोडून तिकडे गेले त्यांना उमेदवारी द्यायची की नाही हा त्या त्या पक्षाचा अधिकार असून, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे आमच्याही काही लोकांनी सत्तेच्या ओढीने पक्षांतर केले. विरोधी पक्षात राहण्याची त्यांची मानसिकता नसल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. आपण मात्र संसदीय कारकिर्दीच्या ५२ वर्षांपैकी २७ वर्षे विरोधी पक्षात होतो असे सांगून पवार यांनी, विरोधी पक्षात असलो की समाधान मिळते कारण सत्तेत असल्यावर आपण काय निर्णय घेतले व त्याची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे कळत नाही. विरोधी पक्षात असल्यावर कोणतीही जबाबदारी नसते. उलट विरोधी पक्षात असताना लोकांच्या संपर्कात राहून सरकार विषयीची वस्तूस्थिती समजत असते, अशी पुष्टीही जोडली.
त्याचबरोबर भाजप-सेनेत सुरू असलेल्या बेबनावामुळे युती तुटणार काय? या प्रश्नावर बोलताना पवार यांनी, केंद्रात व राज्यात सत्तेची ऊब दोन्ही पक्षांना मिळाली असून, सत्तेची ऊब कोणी सहजासहजी सोडत नाही. या उपरही युती ठेवायची की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे सांगितले. वंचित आघाडीमुळे राज्यातील आठ मतदारसंघात परिणाम झाला आहे. परंतु आता वंचित आघाडीने त्यांची भूमिका जाहीर केल्यामुळे त्यांना कॉँग्रेस आघाडीत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे पवार यांनी सांगितले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे असून, लोकसभेला देशाचे नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचे, असा मतदार विचार करतो तर विधानसभेला मतदाराला त्याचे मतदारसंघातील प्रश्न, दैनंदिन समस्या लक्षात घेऊन कोण सक्षम उमेदवार त्यावर आपले मत तयार करीत असतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उद्योग-धंद्यांची मंदी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कांदा आयात आदी प्रश्नांवर लढविली जाणार असून, नोटबंदीचे परिणाम आता दिसू लागले असल्याचेही पवार यांनी सांगितले.
ईडीच्या नोटिसांद्वारे राष्टवादी नेत्यांना धमकी
ईडीची नोटीस दाखवून माझ्या सहकाऱ्यांना धमकावण्यात आले. मी नावं उघड करणार नाही मात्र आमच्यातून गेलेल्या काहीजणांनी हे सांगितलं, असा दावा शरद पवार यांनी केला. उदयनराजेंच्या आरोपांवर काहीही बोलायचे नाही. त्यांना १५ वर्षांनंतर हे आरोप सुचले का?, इतकाच माझा प्रश्न आहे, असा टोलाही पवारांनी लगावला.
आघाडीत मनसे नाही
च्ईव्हीएमच्या विरोधात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची राज ठाकरे यांची भूमिका मान्य नसून, मित्रपक्षांनीदेखील मनसेला सोबत घेण्यात सकारात्मकता दर्शविलेली नाही, त्यामुळे मनसेचा आघाडीत समावेश राहणार नाही, असेही
पवार यांनी सांगितले.
जनतेला मेगाभरती पसंत नाही
च्१९६२ मध्ये निवडणूक झाल्यावर यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सत्तेत आली. त्यावेळी वर्ष, सहा महिन्यात जे संयुक्त महाराष्ट चळवळीतून निवडून आले होते अशा सर्वांनी पक्षांतर केले. त्यामुळे यापूर्वीही मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. परंतु सध्याचा पक्षांतराचा वेग त्यापेक्षा गतिमान असून, लोक शहाणे असतात. त्यांना ही ‘मेगा’भरती पसंत आहे असे वाटत नाही, असेही पवार म्हणाले.
राजेंना समज यायला पंधरा वर्षे गेली
च्उदयनराजे भोसले यांनी पंधरा वर्षे राष्टवादीत वाया गेल्याची टीका केल्याच्या प्रश्नावर पवार यांनी, राष्ट्रवादीत अन्याय झाल्याचे समज यायला राजेंना पंधरा वर्षे लागली, अशी टिप्पणी पवार यांनी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक