शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या डाळीला उठावाची शक्यता

By admin | Updated: September 11, 2016 02:03 IST

दर्जा बदलला : खुल्या बाजाराच्या भाववाढीचा परिणाम

 नाशिक : दुय्यम दर्जा व खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव असल्यामुळे रेशनच्या तूरडाळीकडे पाठ फिरविलेले दुकानदार रेशनसाठी तूरडाळ उचलण्याची शक्यता पुरवठा खाते व्यक्त करीत असून, नाशिक शहराला पुरविण्यात आलेली निकृष्ट डाळ पुरवठादाराने बदलून दिल्यामुळे व खुल्या बाजारात दर वाढल्यामुळे येत्या आठवड्यात शिधापत्रिकाधारकांना रेशनमधून डाळ उपलब्ध होणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी पावणे पाच हजार क्विंटल तूरडाळ शासनाने मंजूर करीत, पुरवठादारामार्फत ती उपलब्धही करून दिली. परंतु या डाळीचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने नांदगाव, नाशिक धान्य वितरण अधिकाऱ्यांनी शासकीय गुदामात डाळ उतरवून घेण्यास नकार देत, परत पाठविली होती. मुळात तूरडाळ दर्जाहीन व त्यातच तिचा दरही १०३ रुपये किलो असल्याने शिधापत्रिकाधारक घेणार नाहीत यावर ठाम असलेल्या रेशन दुकानदारांनी तूरडाळ घेण्यास नकार दिला. रेशनमधून तूरडाळ उपलब्ध झाल्याचे पाहून खुल्या बाजारात दीडशे ते १८० रुपयांपर्यंत पोहोचलेली डाळ अगदीच ९० ते शंभर रुपयांपर्यंत आल्यामुळे रेशनची दर्जाहीन तूरडाळ कोण घेईल, असा प्रश्न निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर पुरवठा खात्याने जिल्ह्यातील प्रत्येक तूरडाळीच्या दर्जाची तपासणी करून घेतली. त्यातून वाहतुकदाराने खराब डाळ परत नेली व ती बदलून दिली आहे. नवीन आलेल्या तूरडाळीचे नमुने तपासण्यात आले असून, ती उत्कृष्ट दर्जाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सणासुदीचे दिवस पाहता खुल्या बाजारात तूरडाळीचे दर पुन्हा दीडशे रुपयांच्या पुढे सरकले असून, सामान्यांना ती परवडणारी नसल्याने रेशनमधून १०३ रुपयांच्या डाळीला शिधापत्रिकाधारक पसंती देतील, अशी अपेक्षा पुरवठा खाते व रेशन दुकानदार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात दुकानदारांकडून रेशनच्या तूरडाळीची मागणी वाढेल, असे पुरवठा खात्याला वाटू लागले आहे. दरम्यान, खासगी केंद्रांवर स्वस्त दरात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा पुरवठा खात्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला असला तरी, त्यासाठी डाळ उपलब्ध करून देण्यास हात आखडता घेतल्याने हा प्रस्ताव गुंडाळला गेला आहे. (प्रतिनिधी)