शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वावी संस्थेच्या अध्यक्षपदी काटे

By admin | Updated: September 8, 2016 00:24 IST

बिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी कल्पलता वेलजाळी

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी विजय भीमराव काटे, तर उपाध्यक्षपदी कल्पलता कारभारी वेलजाळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.गेल्या दहा दिवसांपूर्वी विकास संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक झाली होती. या चुरशीच्या निवडणुकीकडे संपूर्ण ताालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपसरपंच विजय काटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचा पराभव केला होता. शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकल्या होत्या. संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत अध्यक्ष-पदासाठी विजय काटे तर उपाध्यक्षपदासाठी कल्पलता वेलजाळी यांचे प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. काटे यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सुधाकर कारभारी उगले, तर अनुमोदक म्हणून विजय भगीरथ जाजू यांनी स्वाक्षरी केली होती. वेलजाळी यांच्या उपाध्यक्षपदाच्या अर्जावर सूचक म्हणून मंदा भागवत वैराळ, तर अनुमोदक म्हणून सोमनाथ केदू कांदळकर यांनी स्वाक्षरी केली होती. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षपदी काटे, तर उपाध्यक्षपदी वेलजाळी यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.यावेळी संचालक संतोष कर्पे, संजय वेलजाळी, दिनकर वेलजाळी, संतोष काटे, ज्ञानदेव काटे, नवनाथ घेगडमल, आनंदा शेलार सचिव बाळकृष्ण सोनवणे उपस्थित होते. बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष विजय काटे व उपाध्यक्ष कल्पलता वेलजाळी यांच्यासह संचालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच चंद्रकांत वेलजाळी, रामनाथ कर्पे, विठ्ठल गोराणे, भीमराव काटे, ग्रामपंचायत सदस्य सतीश भुतडा, प्रशांत कर्पे, कारभारी वेलजाळी, दत्तात्रय वेलजाळी, गणेश वैराळ, विनायक घेगडमल, अशोक वेलजाळी, नवनाथ काटे, बबन काटे, दत्तात्रय नवले, भानुदास भेंडाळे, भागवत वैराळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)