शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या सर्व शाळांना ब्रॉड बॅण्ड कनेक्शन

By admin | Updated: July 22, 2014 01:15 IST

महापालिकेच्या सर्व शाळांना ब्रॉड बॅण्ड कनेक्शन

 

नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत़ संगणक कक्ष, ई - लर्निंग असे आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यात येत असून, शाळांचा ई - संवाद वाढविण्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांना ब्रॉड बॅण्ड कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती महापौर अ‍ॅड़ यतिन वाघ यांनी येथे दिली़चुंचाळे गावठाण येथील शाळा क्रमांक २८ व १०० येथे महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या संगणक कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ अ‍ॅड़ वाघ, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रचे उपाध्यक्ष हिरामण अहेर व उपस्थितांच्या हस्ते कक्षाचे उद्घाटन करण्यात आले़अ‍ॅड. वाघ म्हणाले, संगणक शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे़ यामध्ये महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी मागे राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल़ तसेच विद्यार्थ्यांच्या इतर विकासासाठी महापालिका शिक्षण मंडळास जास्तीत जास्त निधी दिला जाणार आहे़ विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसह पालकांनीही आपली भूमिका योग्यरीत्या निभावण्याचे आवाहन त्यांनी केले़ महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण अहेर म्हणाले, गरीब व गरजू मुलांच्या विकासासाठी कंपनी सामाजिकतेच्या भावनेतून मदत करते़ संगणक कक्षाद्वारे या मुलांच्या विकासात हात लागणार असल्याचे समाधान मिळत आहे़ यावेळी उपस्थितांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले़ तसेच सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वितरण त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आले़ याप्रसंगी महापालिकेचे उपआयुक्त बी़ टी़ गोतिसे, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी किरण कुंवर, महेश चिटणीस, नगरसेवक नंदिनी जाधव, सचिन भोर, मुख्याध्यापक अर्जुन राजभोज, देवेंद्र सोनार, तुकाराम खेमनार, जयंत येवला, हेमंत पवार, संजय बोरसे, छाया जाधव, उर्मिला पवार, पुष्पा पिंगळे, मनीषा पाटील, पूजा सावंत, रोहिणी अहिरराव, खासेराव भोसले आदि उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय सूर्यवंशी यांनी केले़ स्वागत अविनाश कोठावदे यांनी केले, तर आभार अनिल सुळ यांनी मानले़ (प्रतिनिधी)