शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबी पेटविताना दोघे भाजले

By admin | Updated: December 21, 2015 23:43 IST

कोटमगाव : सोसायटी निवडणुकीत हाणामारी; सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

नाशिकरोड : कोटमगाव विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक मतदानप्रसंगी दोन्ही पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे, तर निवडणुकीच्या निकालावरून रविवारी मध्यरात्रीनंतर डोंगर खाणीजवळ उभा असलेला ‘पोकलॅन मशीनवर’ ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्यात आला. पोकलॅन मशीन जाळताना दोघे संशयितदेखील भाजले आहेत. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक तालुक्यातील कोटमगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या दहा जागांसाठी रविवारी मतदान व मतमोजणी होती. या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचे तीन जण यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. रविवारी सकाळी ८ वाजता मतदानप्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात ग्रामविकास व परिवर्तन पॅनलच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये मतदारास मतदान केंद्रावर घेऊन जाण्यावरून सकाळी ९ वाजेच्या सुमारास वादविवाद झाल्याने हाणामारी होऊन दगडफेक झाली. यामुळे गावांत तणावाचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी संपत गोविंद घुगे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मतदाराला त्यांच्या घरचेच मतदानाला घेऊन जातील असा ठराव झालेला असताना एका वयस्कर व्यक्तीला मतदानासाठी घेऊन जात होते. याबाबत विचारणा केली असता प्रकाश घुगे, ज्ञानेश्वर घुगे, अशोक घुगे, वसंत घुगे, अंबादास घुगे, भुषण घुगे, शरद घुगे, किरण घुगे, दिनकर म्हस्के यांनी शिवीगाळ, मारहाण करून दगडफेक केली. यामध्ये शिवाजी घुगे यांच्या गळ्यातील चैन गहाळ झाली. या दगडफेकीत फिर्यादी संपत घुगे, शिवाजी घुगे, सुभाष घुगे, विष्णू घुगे, सुरेश घुगे, रामनाथ घुगे, खंडेराव घुगे हे जखमी झाले असून, त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर प्रकाश दत्तू घुगे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मतदानासाठी रांगेत उभे असताना एका वयस्कर व्यक्तीला सहकार्य करा, असे एका मतदानप्रक्रियेतील कर्मचाऱ्याने सांगितल्याने त्या वयस्कर व्यक्तीला मदत केली त्याचा राग मनाशी धरून संपत घुगे, शिवाजी घुगे, खंडु घुगे, किसन घुगे, रामदास घुगे, भानुदास घुगे, सुरेश घुगे, विष्णु घुगे, सुभाष घुगे, भास्कर घुगे, पप्पू म्हस्के, केशव म्हस्के यांनी शिवीगाळ करून मारहाण करीत दगडफेक केली. यामध्ये फिर्यादी प्रकाश घुगे, अशोक घुगे, अंबादास घुगे, ज्ञानेश्वर घुगे, दिनेश म्हस्के, कचरू म्हस्के, पोलीस हवालदार टी. के. गायकवाड हे जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, संशयित केशव म्हस्के, भानुदास घुगे यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

पोकलॅन मशीन पेटविलेयाबाबत पुष्पा ज्ञानेश्‍वर घुगे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास आपल्या घरावर दगड फेकण्यात येऊन दरवाजा ठोठविण्यात आला. यावेळी भानुदास घुगे, अक्षय उर्फ सुभाष म्हस्के, गौरव शिवाजी घुगे, योगेश अशोक घुगे, पंडित रामदास घुगे व एक अनोळखी युवक यांनी तुमच्या घरच्यांनी आमच्या घराच्या काचा फोडल्या आहेत आम्हीपण तुमचे घर, गाड्या जाळू अशी धमकी देत निघून गेले. त्यानंतर रात्री अडीच वाजेच्या सुमारास घरासमोरील डोंगर खाणीजवळ मोठा आगीचा भडका झाल्याचे लक्षात आले. त्याठिकाणी असलेला वॉचमन अशोक याने पोकलॅनला आग लागल्याचे फोनवरून घुगे कुटुंबीयांना कळविले. सदर घटनेची माहिती तत्काळ पोलीस, अग्निशामक केंद्राला कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ व अग्निशामकच्या बंबाने पोकलॅन मशीनला लावलेली आग विझवली. सोमवारी सकाळी पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, पी. आर. ढोकणे आदिंनी ग्रामस्थांची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार निफाड तालुक्यातील सायखेडाजवळील साईश्रद्धा हॉस्पिटलमध्ये पोकलॅन मशीनला आग लावताना दोघेजण भाजून जखमी झालेले उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. नाशिकरोड पोलिसांनी लागलीच  साईश्रद्धा हॉस्पिटलमध्ये धाव घेतली असता तेथे अक्षय उर्फ पप्पू सुभाष म्हस्के, राहुल रामदास तावडे, रा. पळसे हे दोघे उपचार घेताना मिळून आले. अक्षय ४0 टक्के व राहुल २२ टक्के भाजला आहे. दोघा जखमींना सोमवारी पहाटे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. एका हॉटेलमध्ये जेवायला बसलो असताना सिलिंडरचा स्फोट झाल्याने भाजलो असे कारण सांगून त्यांना उपचाराकरिता दाखल करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.