शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

जनस्थान कलाकारांनी घडविली बॉलिवूड सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:25 AM

पावसाच्या सरीनंतरची रम्य सायंकाळ, मनाचा ठाव घेणाऱ्या जुन्या-नव्या गाण्यांवर आबालवृद्ध कलाकारांकडून सादर होत असलेली नृत्ये, त्याला टाळ्या-शिट्यांच्या गजरात मिळत असलेला प्रतिसाद यामुळे श्रोते भारावून गेले होते.

नाशिक : पावसाच्या सरीनंतरची रम्य सायंकाळ, मनाचा ठाव घेणाऱ्या जुन्या-नव्या गाण्यांवर आबालवृद्ध कलाकारांकडून सादर होत असलेली नृत्ये, त्याला टाळ्या-शिट्यांच्या गजरात मिळत असलेला प्रतिसाद यामुळे श्रोते भारावून गेले होते. निमित्त होते जनस्थान फेस्टिव्हल अंतर्गत ‘रेट्रो ते मेट्रो’ कार्यक्रमाचे. शनिवारी (दि.२३) सायंकाळी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.  गणेशवंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर नाशिकमधील नवोदित ते ज्येष्ठ नामवंत कलाकारांनी विविध हिंदी गीतांवर प्रभावी नृत्ये सादर केली. वेशभूषा, केशभूषा, नृत्याची कोरिओग्राफी या साºया गोष्टी वाखाणण्याजोग्या होत्या. प्रारंभी दीपक करंजीकर, विद्या करंजीकर यांनी ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे नृत्य सादर केले.  नृत्यांच्या दरम्यान चार स्कीटही सादर करण्यात आली. कार्यक्रमा दरम्यान पुरस्कारही देण्यात आले. प्रसिद्ध आरजे भूषण मटकरी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. त्यांनी आपल्या निवेदनात प्रत्येक गाण्याची पार्श्वभूमी, इतिहास, ते गाणे सादर करणाºया कलाकारांचे आयुष्यातील गमतीशीर किस्से आदींची माहिती दिली. सर्व नृत्यांचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले होते. कार्यक्रमास नाशिककर रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विविध गीतांवर नृत्य सादरसदानंद जोशी, हेमा जोशी यांनी ‘भोली सुरत’, अविराज तायडे, श्रेया जोशी यांनी ‘सर जो तेरा चकराये’, कांचन पगारे यांनी ‘हम काले है तो क्या हुआ’, सी.एल. कुलकर्णी, माधुरी कुलकर्णी यांनी ‘आज कल तेरे मेरे’, लक्ष्मी पिंपळे यांनी ‘पिया तु अब तो आजा’, विनायक रानडे यांनी ‘कभी किसीसे प्यार किया’, कैलास पाटील, शीतल सोनवणे यांनी ‘जय जय शिव शंकर’, भूषण मटकरी, नूपुर सावजी यांनी ‘चुम्मा चुम्मा दे दे’, कीर्ती भवाळकर यांनी ‘पिया बावरी’, मोहन उपासनी यांनी ‘डिस्को डान्सर’, सुमुखी अथनी यांनी ‘मोरनी बागामा बोले’, सुहास भोसले यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, संजय गिते, प्रिया तुळजापूरकर यांनी ‘धिनाधीन’, विद्या देशपांडे यांनी शास्त्रीय नृत्य, पीयूष नाशिककर यांनी ‘बरदाश नही करता’ आदी विविध गीतांवर सुंदर नृत्य सादर केले.

टॅग्स :Nashikनाशिक