शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण समिती सभापतीपदी भाजपाच्या सोनवणे; गटबाजीचा लाभ उठविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 16:28 IST

शिक्षण समितीवर भाजपाचे पाच, सेनेचे तीन व एक कॉँग्रेसचा सदस्य असल्याने साहजिकच भाजपाचा वरचष्मा असला तरी, सेनेने ही निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून सुदाम डेमसे यांना सभापतिपदाची उमेदवारी दिली होती.

ठळक मुद्देसभापती, उपसभापतिपदी सेनेचे उमेदवार पराभूत उपसभापतिपदी भाजपाच्याच प्रतिभा पवार सेनेचे सुदाम डेमसे यांना तीनच मते मिळाली.

नाशिक : नाशिक महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रा. सरिता सोनवणे यांची निवड करण्यात आली. बहुमत भाजपाच्या बाजूने असूनही या निवडणुकीत शिवसेनेनेही उमेदवार उभा करून भाजपांतर्गत गटबाजीचा लाभ उचलण्याचा केलेला प्रयत्न फसून सभापती, उपसभापतिपदी सेनेचे उमेदवार पराभूत झाले. उपसभापतिपदी भाजपाच्याच प्रतिभा पवार यांची निवड करण्यात आली.शिक्षण समितीवर भाजपाचे पाच, सेनेचे तीन व एक कॉँग्रेसचा सदस्य असल्याने साहजिकच भाजपाचा वरचष्मा असला तरी, सेनेने ही निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून सुदाम डेमसे यांना सभापतिपदाची उमेदवारी दिली होती. तर भाजपाकडून सभापतिपदासाठी सरिता सोनवणे व उपसभापतिपदासाठी प्रतिभा पवार या दोघांनी उमेदवारी देऊन त्यांचे नामांकनही दाखल केले होते. परंतु सेनेने या निवडणुकीत चमत्कार करण्याच्या दृष्टीने दोन्ही जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांच्या अध्यक्षतेखाली समिती सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली. त्यात उमेदवारी अर्जाची छाननी, माघारीसाठी वेळ देण्यात आला व प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात करण्यात आल्यावर सभापतिपदासाठी सरिता सोनवणे यांच्या बाजूने भाजपाच्या पाचही सदस्यांनी हात वर केले. तर सेनेचे सुदाम डेमसे यांना तीनच मते मिळाली. त्यामुळे सोनवणे यांच्या निवडीची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर उपसभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात भाजपाच्या प्रतिभा पवार यांच्या बाजूने पाच तर सेनेचे संतोष गायकवाड यांच्या बाजूने चार मते मिळाली. कॉँग्रेसचे राहुल दिवे यांनी सेनेच्या बाजूने मतदान केले. दरम्यान या निवडीनंतर भाजपाच्या सदस्यांनी जल्लोष केला. नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचा महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी सभापती हिमगौरी आडके, संभाजी मोरूस्कर, जगदीश पाटील, राहुल दिवे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEducationशिक्षण