शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

महापौर निवडणुकीत फाटाफूट होण्याची भीती, भाजपाचे नगरसेवक सहलीसाठी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 16:47 IST

नाशिकच्या महापौरपदाची निवडणुक येत्या 22 नोव्हेंबरला होणार आहे.

नाशिक : बहुमत असताना नाशिक महापालिकेत भाजपाला महापौर पदाच्या निवडणुकीत महाशिवआघाडी आव्हान देण्याची तयारी करीत असल्याने भाजपाच्या बहुतांशी नगरसेवकांना शनिवारी सहलीसाठी पाठवण्यात आले आहे. 

नाशिकच्या महापौरपदाची निवडणुक येत्या 22 नोव्हेंबरला होणार आहे. महापालिकेत सध्या 65 नगरसेवक असल्याने भाजपाचे बहुमत आहे. मात्र, राज्यातील नव्या सत्ता समीकरणाप्रमाणे शिवसेनेचे 34, काँग्रेस- राष्ट्रवादीचे 12, मनसेचे 5, अपक्ष 3 आणि रिपाई आठवले गटाचा 1 असे सर्व एकत्र झाल्यास 55 अशी संख्या होते. त्यामुळे भाजपाचे सहा नगरसेवक फुटल्यास किंवा अनुपस्थित राहिल्यास सत्तांतर होऊ शकते. त्यामुळे भाजपाने दखल घेत आज सर्व नगरसेवकांना सहलीला पाठविले आहे. मात्र, 7 नगरसेवकांनी सहलीवर जाण्यास नकार दिल्याने भाजपाचे धाबे दणाणले आहे.

हे सर्व जण अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारलेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक आहेत. विशेष म्हणजे सानप सध्या शिवसेनेत आहेत आणि नाशिक महापालिकेत महाशिवआघाडी तयार करण्यासाठी शिवसेनेनेच पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपा