शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी भाजपाचा उमदेवार आज ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 19:05 IST

नाशिक- भाजपातील आठ जण संपर्क क्षेत्राबाहेर तर विरोधी आघाडीची तीन दिशेला तीन तोंडे यामुळे महापौरपदाची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देखील समिकरणे जुळवणे अवघड झाले आहे. दरम्यान, भाजपचा उमेदवार मंगळवारी (दि.१९) निश्चित होण्याची शक्यता आहे. माजी पालकमंत्री गिरीश महाजन आणि उत्तर महाराष्टÑ संघटनमंत्री किशोर काळकर सध्या कोकणात असलेल्या भाजप नगरसेवकांशी चर्चा करून निर्णय देणार आहेत.

ठळक मुद्देमहाजन काळकर ऐकणार नगरसेवकांची मतेकॉँग्रेसचे नगरसेवक सहलीवरराष्टÑवादीचे आज ठरणार

नाशिक-भाजपातील आठ जण संपर्क क्षेत्राबाहेर तर विरोधी आघाडीची तीन दिशेला तीन तोंडे यामुळे महापौरपदाची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देखील समिकरणे जुळवणे अवघड झाले आहे. दरम्यान, भाजपचा उमेदवार मंगळवारी (दि.१९) निश्चित होण्याची शक्यता आहे. माजी पालकमंत्री गिरीश महाजन आणि उत्तर महाराष्टÑ संघटनमंत्री किशोर काळकर सध्या कोकणात असलेल्या भाजप नगरसेवकांशी चर्चा करून निर्णय देणार आहेत.

शुक्रवारी (दि.२२) रोजी महापौरपदाची निवडणूक होत असून त्यासाठी मनसे आणि राष्टÑवादी वगळता सर्व पक्षांनी आपले नगरसेवक सहलीवर पाठविले आहेत. सोमवारी (दि.१८) कॉँग्रेसचे नगरसेवक रवाना झाले. तर राष्टÑवादीचे नगरसेवक अद्याप रवाना झालेले नाही. मंगळवारी (दि.१९) उमेदवारी अर्ज घेऊन ते रवाना होण्याची शक्यता असल्याचे राष्टÑवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले.

भाजपाच्या संपर्कात दहा ते बारा नगरसेवक नव्हते. मात्र अनेकांचा संपर्क झाला असून आता अवघ्या आठ जणांचा संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती गटनेते जगदीश पाटील यांनी दिली. अर्थात, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांच्याशी संपर्क झाला असे भगवान दोंदे, राकेश दोंदे आणि पुंडलीक खोडे असे तीन नगरसेवक भाजपाच्या कॅम्प बरोबर सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस