पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

By Admin | Updated: September 1, 2016 22:30 IST2016-09-01T22:28:24+5:302016-09-01T22:30:46+5:30

काळुस्ते : चौघे अत्यस्वस्थ

Bitten ten dogs with leprosy dogs | पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा


घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथे गुरुवारी सकाळी अंत्यविधीत एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालीत तब्बल दहा जणांचे लचके तोडले. यात चौघांची प्रकृती अत्यस्वस्थ असल्याने त्यांना उपचारार्थ नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
काळुस्ते येथे एका इसमाच्या अंत्यविधीला अनेक गावांहून नातलग आले होते. अंत्यविधी सुरू असताना अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने काही माणसांवर हल्ला केला. या हल्ल्यात लहानू रामजी खाडे (५०), रामदास मंगळू खोकले (४९), नथू महादू खाडे (६०), गणपत लक्ष्मण घाणे व सोनाली संतू म्हसकर (१३) या पाच जणांना चावा घेतला. यात चौघे जण गंभीर जखमी झाले असून, सर्व जखमींना घोटी रुग्णालयात हलविले; मात्र रुग्णांची स्थिती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Bitten ten dogs with leprosy dogs