शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
"माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
6
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
7
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
8
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
9
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
10
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
11
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
12
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
13
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
14
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
15
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
16
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
17
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
18
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
19
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
20
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारमला आरोग्य खात्याची इमारत सेवेत रुजू

By admin | Updated: October 25, 2016 00:16 IST

येवला : डोंगरगाव, तळवाडे, अंगुलगाव आदि गावांना मिळणार सेवा

येवला : भारम येथील आरोग्य केंद्राची इमारत ग्रामस्थांच्या सेवेत लवकरच रूजू होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी सांगितले. राजापूर गटात एकही प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने भारम, राजापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांना अंदरसूल, येवला, नांदगाव, वैजापूर येथे आरोग्याची सुविधा घेण्यासाठी जावे लागत होते. ग्रामस्थांची अडचण लक्षात घेता राजापूर गटात भारम व राजापूर येथे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. राजापूर आरोग्य केंद्रासाठी २ कोटी ५० लाख व भारम आरोग्य केंद्रासाठी एक कोटी ५० लाख, देवठाण उपकेंद्रासाठी १ कोटी २५ लाख, भुलेगाव उपकेंद्रासाठी १८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. भारम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत दोन वर्षांपासून बांधून पूर्ण झाली आहे. शासनाकडे पदे मंजूर होण्यासाठी तसेच राजापूर व भारम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पदे मंजुरीसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. आरोग्य सचिवाकडे दोन वर्षांपासून जिल्हा परिषदमार्फत शासनाकडून विविध सेवा व पदे मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे. परंतु शासनाने यासंबंधी निर्णय न घेतल्यामुळे इमारती पूर्ण होऊनसुद्धा नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून भारम हे प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाचा पदे मंजूर होईपर्यंत पर्यायी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपलब्ध करून हे केंद्र लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने यासंबंधी ७ आॅक्टोबर रोजी आदेश काढले आहेत. जिल्हा आरोग्या-धिकारी यांनी अंमलबजा-वणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केली असल्याचे जिल्हा परिषद सदस्य गायकवाड यांनी सांगितले. (वार्ताहर)