शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाचे छप्पर कोसळून लाभार्थी महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:56 IST

सुरगाणा : तालुक्यातील बारागाव डांग विभागातील ग्रामपंचायत गोंदुणे अंतर्गत पिंपळसोंड येथे इंदिरा आवास योजनेचे घरकुलाचे छप्पर अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत राहीबाई सोमा गावित (५३) या लाभार्थी महिलेचा मृत्यू झाला तर तिचे पती सोमा गावित (५८) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपिंपळसोंड येथील घटना : हप्ता न मिळाल्याने अर्धवट बांधकाम

सुरगाणा : तालुक्यातील बारागाव डांग विभागातील ग्रामपंचायत गोंदुणे अंतर्गत पिंपळसोंड येथे इंदिरा आवास योजनेचे घरकुलाचे छप्पर अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत राहीबाई सोमा गावित (५३) या लाभार्थी महिलेचा मृत्यू झाला तर तिचे पती सोमा गावित (५८) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलीस पाटील रतन खोटरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी (दि.११) दीड ते दोन वाजेच्या सुमारास राहीबाई व तिचे पती सोमा गावित हे घरात जेवण करत असतांना अचानक पणे इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधलेले घरकुलाचे कौलारू छप्पर कोसळल्याने गंभीर जखमी होऊन राहीबाईचा जागीच मृत्यू झाला तर पतीला गंभीर दुखापत झाली आहे.

अलगदपणे ठेवलेले खांब कोसळल्याने पूर्ण घरच ढासळून जमिनदोस्त झाले. पिंपसोंड हा भाग गुजरात सिमावर्ती लगत असून अतिदुर्गम आहे. महिलेचे नातेवाईक मजुरी करीता बाहेरगावी गेले होते. ते आल्यावर रात्री उशिरामृतदेह शवविच्छेदना करीता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलाअसून शवागारात ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१२) सकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रभाकर सहारे, चंद्रकांत दवंगे हे करीत आहेत.कोट....पाच ते सात वर्षापूर्वी सदर लाभार्थी महिलेस इंदिरा आवास योजनेचे घरकुल मिळाले होते. घरकुलाचा पहिला हप्ता लाभार्थी महिलेस मिळाला मात्र पुढील हप्ते अद्यापही मिळाले नाहीत.आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने घरकुलाचे बांधकाम पूर्ण करता आले नाही. दुसरे घर नसल्याने अपुर्ण असलेल्या घरातच नाईलाजाने रहावे लागत होते. घरकुलाच्या जोत्यावर पैशांअभावी विट बांधकाम न करता आल्याने अलगदपणे ठेवलेले खांब कोसळल्याने पुर्ण घरच ढासळून जमिनदोस्त झाले. यातच लाभार्थीचा दबून मृत्यु झाला.- सोन्या बागुल, माजी ग्रा.पं. सदस्यइंदिरा आवास योजनेचे घरकुल अंगावर कोसळून घरातच लाभार्थीचा मृत्यू झाला हि अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून याबाबत तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश तलाठी एम.के. गायकवाड यांना दिले आहेत.- किशोर मराठे, तहसिलदार.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू