शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी थकबाकीदारांविरुद्ध जप्तीच्या कारवाईस सुरुवात

By admin | Updated: November 18, 2016 00:22 IST

महापालिका : २२ थकबाकीदारांना दिले वॉरंट

 नाशिक : हजार-पाचशेच्या नोटाबंदीमुळे एकीकडे महापालिकेची घरपट्टी व पाणीपट्टीची कोट्यवधी रुपयांची वसुली होत असतानाच दुसरीकडे थकबाकीदारांना वॉरंट बजावत जप्तीची कारवाईही सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या खजिन्यात येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत हजार-पाचशेच्या नोटांच्या माध्यमातून आणखी भर पडण्याची शक्यता आहे. महापालिकेला करवसुलीसाठी हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मिळाल्यानंतर दि. १० नोव्हेंबरपासून शहरातील सर्व बिलिंग सेंटरवर वसुली सुरू करण्यात आली. दि. १० ते १४ नोव्हेंबर या कालावधीत महापालिकेची ९ कोटी १४ लाख रुपये घरपट्टी, तर १ कोटी ९६ लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली. त्यानंतर शासनाने करवसुलीसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत आणखी मुदतवाढ दिल्याने पाचशे-हजारच्या नोटांच्या माध्यमातून करभरणा सुरूच आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर थकबाकीदारांचाही समावेश आहे. दि. १५ रोजी घरपट्टी ५८ लाख ३६ हजार तर पाणीपट्टी १६ लाख १७ हजार, दि. १६ रोजी घरपट्टी ६२ लाख ३९ हजार, तर पाणीपट्टी १७ लाख ५७ हजार आणि दि. १७ रोजी घरपट्टी ५२ लाख ५९ हजार, तर पाणीपट्टी १७ लाख ३ हजार रुपये वसुली झाली आहे. दि. १५ ते १७ या तीन दिवसांच्या कालावधीत मनपाच्या खजिन्यात घरपट्टी व पाणीपट्टी मिळून सव्वादोन कोटी रुपये जमा झाले आहेत. दि. २४ नोव्हेंबरपर्यंत पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारल्या जात असल्याने या काळात जास्तीत जास्त थकबाकी वसूल व्हावी यासाठी महापालिकेने थकबाकीदारांवर जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दोन दिवसात महापालिकेने २२ थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट बजावले आहे. मनपाच्या या जप्तीच्या कारवाईच्या भीतीने थकबाकीदारांकडून रक्कम जमा केली जाणाच्या शक्यता आहे. (प्रतिनिधी)