शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावला

By admin | Updated: January 22, 2016 22:38 IST

ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावला

जोरण : वातावरणातील सततच्या बदलांमुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन ते तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे परिसरातील शेतकरी धास्तावला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून पर्जन्यवृष्टी कमी होत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यात शेवटच्या चरणात समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तब्बल पाच वर्षांनंतर झालेल्या पावसाच्या भरवशावर परिसरात खरिपाच्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली; मात्र सर्वत्र पिके जोमात असताना सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे खरिपातील सर्वच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट आली, तर अनेक पिके शेतातच सडल्याने उत्पादनावर केलेल्या खर्चातही तूट आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. असे असतानाही रब्बीच्या पिकांसाठी बळीराजाने पुन्हा कंबर कसली व उन्हाळी कांदा, टमाटे, फ्लॉवर आदि पिकांची लागवड केली आहे. या रोगांपासून पिके वाचवण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी सध्या चालू आहे. २-३ दिवसांपासून निर्माण होणारे ढगाळ वातावरण बळीराजाची काळजी वाढवणारे ठरत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने गारपीट होण्याचा इशारा दिला होता. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे तसेच अवकाळी पाऊस, गारपीट होण्याच्या शक्यतेमुळे कांदा व इतर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे. चिंतेचे हे ढग निवळले तरच रब्बीची पिके या संकटातून वाचतील व हाती चार पैसे येतील अशी बळीराजाला आशा आहे. (वार्ताहर)