शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बाजीराव जाधव : साडेनऊ कोटी मंजूर

By admin | Updated: April 11, 2015 00:02 IST

वनौषधींचे होणार बॅ्रण्ंिडग

 नाशिक : आदिवासी बांधवांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी आता आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी भागातील ३३ प्रकारच्या वनउपज व वनऔषधांचे पॅकेजिंग, मार्केटिंग आणि बॅ्रण्ंिडग करण्यात येणार असून, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव यांनी दिली.दरम्यान, मोहाच्या फुलांपासून सरबत तयार करण्याचा प्रकल्प गडचिरोली येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला असून, तो यशस्वी झाल्यास राज्यभर तसे प्रकल्प राबविण्याबाबत महामंडळाची तयारी असल्याची माहिती सूत्रांंनी दिली. त्यामुळे आदिवासी विकास विभाग आता मोहाच्या फुलांपासून बनविण्यात येणाऱ्या सरबताच्या ‘मोहात’ अडकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर मोहाच्या फुलांपासून मद्य बनविण्यात येते.आदिवासी भागातील हिरडा, मध, डिंक, चिंच, खुरसणी, मोह आदिंसह ३३ वेगवेगळ्या प्रकारच्या वनउपजांची अत्यंत कमी भावात आदिवासी बांधव शहरात येऊन विक्री करतात. मात्र, हे वनउपज स्वच्छ व साफ करून त्यांचे पॅकेजिंगचे काम महिला बचतगटांना देऊन त्यांच्या वनउपजांना चांगला भाव मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास महामंडळ आता पुढाकार घेणार असून, या वनउपजांची पॅकेजिंगचे काम महिला बचतगटांना देऊन त्याचे मार्केटिंग व ब्रॅण्डिगचे कामही आदिवासी विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी भागातील वनऔषधींचे मार्केटिंग व ब्रॅण्डिग करण्यात येणार असल्याचे बाजीराव जाधव यांनी सांगितले. यासाठी आदिवासी विकास विभागाला केंद्र सरकारकडून ८ कोटी २५ लाख, तर राज्य सरकारकडून १ कोटी २५ लाख असा सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने राज्यात सहा मील (गिरणी) उभारण्यात येणार असून, धान्य साठवणुकीसाठी २९ गुदामांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच महिला बचतगटांना व वैयक्तिक गटांना प्रत्येकी सहा टक्के अल्पदराने यासाठी कर्जही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी धान्य एकाधिकार खरेदी योजना व आधारभूत किमतीद्वारे खरेदी करण्यात आलेल्या धान्याचीही माहिती दिली. (प्रतिनिधी)