बच्चू कडू यांचा कळवण तालुक्यात निषेध

By Admin | Updated: April 2, 2016 00:05 IST2016-04-01T23:22:09+5:302016-04-02T00:05:27+5:30

बच्चू कडू यांचा कळवण तालुक्यात निषेध

Bachu Kadu's protest in Kalwan taluka | बच्चू कडू यांचा कळवण तालुक्यात निषेध

बच्चू कडू यांचा कळवण तालुक्यात निषेध

कळवण : तालुक्यातील नाळीद येथील भूपुत्र, मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भा. र. गावित यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याबद्दल आमदार ओमप्रकाश बाबाराव तथा बच्चू कडू यांचा निषेध नोंदवत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी कळवण तालुक्यातील आदिवासी जनतेसह विविध आदिवासी संघटनांनी केली आहे.
याबाबत आदिवासी बचाव अभियानच्या कळवण तालुका कार्यकारिणी, आदिवासी एकलव्य संघटना, कळवण तालुका आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने आमदार बच्चू कडू यांचा निषेध करण्यात आला असून, आदिवासी बांधवांच्या विविध संघटनांनी कळवणचे नायब तहसीलदार डी. आर. ठाकूर व कळवणचे पोलीस निरीक्षक गावित यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळात आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष व डी. एम. गायकवाड, आदिवासी बचाव अभियानचे के. के. पवार, तुळशिराम बहिरम, संतोष गावित, चिंतामण पवार, भगवान बागुल, मन्साराम चव्हाण, रत्नाबाई जाधव, धनराज वाघ आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Bachu Kadu's protest in Kalwan taluka