शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटी मागितले; अकरा लाखच आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 00:27 IST

नाशिक : गेल्या जून महिन्यात जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडे तीन कोटींची मागणी करण्यात आली होती. परंतु ...

ठळक मुद्देप्रतीक्षा कायम : पीकनुकसान आणि घरपडझडीची भरपाई बाकी

नाशिक : गेल्या जून महिन्यात जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडे तीन कोटींची मागणी करण्यात आली होती. परंतु पशुधन नुकसानीचे केवळ अकरा लाख रुपये इतकीच नुकसानभरपाई अद्याप प्राप्त झाली असून, शेतक?्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, याप्रकरणी पाठपुरावा सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याची शक्यता आगोदरच हवामान खात्याने वर्तविली होती. त्यामुळे प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली होती. परंतु चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्राच्या जवळून गेल्याने जिल्ह्याला वादळाचा फारसा फटका बसला नाही. पाऊस आणि वादळामुळे काही प्रमाणात पिकांचे तसेच घरांचे नुकसान नक्कीच झाले. या नुकसानीचे पंचनामे करून प्रशासनाने भरपाईसाठी तीन कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. मात्र पशुधन नुकसानीचे केवळ ११ लाख रुपयेच प्राप्त झाले असून, अजूनही उर्वरित नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झालेली नाही. या विषयी विचारणा केली असता पंचनाम्यानंतर पुन्हा पाऊस झाल्याने काही ठिकाणी पंचनामे करावे लागले. त्यामुळे सर्व प्रस्ताव सोबत पाठविण्यात आल्याने विलंब झाल्याचे सांगण्यात आले.नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून सहा महिने झाले आहेत. अजूनही घर पडझड व पीक नुकसानीची मदत मिळण्याची प्रतीक्षा आहे. नूकसानभरपाईसाठी तीन कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने केली असून, त्यापैकी पशुधन नुकसानीचे ११ लाखांची मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे. मागील महिन्यातच शेतक?्यांना भरपाई मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र अजूनही याबाबतची कोणतीही स्पष्टता नाही. निसर्ग चक्रीवादळाचे ५३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. जोरदार पावसामुळे तर घरांची पडझड होऊन ४७५ कच्च्या घरांचे छत व पत्रे उडाले तर अनेक ठिकाणी भिंती खचल्या होत्या. निसर्ग चक्रिवादळाने पशुधनाचेदेखील नुकसान झाले होते. ४५ मोठे, तर २८ छोटी जनावरे वीज पडून व अन्य कारणांनी दगावली होती.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती