नाशिक : भोंदू अशोक खरात यास सोमवारी (दि. ४) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता नवव्या गुन्ह्यात त्याला न्या. बी. एन. इचपुरानी यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याचा ताबा आर्थिक फसवणूक प्रकरणात शिर्डी पोलिसांनी घेतला असून, खरातला मंगळवारी राहता न्यायालयात हजर केले जाईल. खरातवर एसआयटीने दाखल केलेल्या ९ गुन्ह्यांची सुनावणी सोमवारी पूर्ण झाली.
खरातने फिर्यादी व्यापाऱ्याकडून अवतार पूजा करायची आहे, असे सांगून चार ते पाच कोटी या गुन्ह्यात उकळले होते. महागडी कारदेखील घेतली होती.
मुक्काम शिर्डी पोलिस ठाणे
शिर्डीतील जमीन फसवणूक व खासगी सावकारी प्रकरणात भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी सोमवारी नाशिक येथे एसआयटीकडून ताब्यात घेतले. अवैध सावकारीद्वारे शिर्डीतील जमिनीचा कथित व्यवहार व राहाता येथील समता क्रेडिट सोसायटीत बनावट खाती उघडल्याच्या प्रकरणांमध्ये खरातचा मुक्काम पुढचे काही दिवस शिर्डी पाेलिस ठाण्यात असू शकतो.
Web Summary : Fraudster Ashok Kharat received judicial custody in a ninth case involving crores extorted from a trader under the guise of avatar worship. Shirdi police took custody for land fraud and private financing issues; investigation ongoing.
Web Summary : धोखेबाज अशोक खरात को अवतार पूजा के नाम पर एक व्यापारी से करोड़ों की उगाही के नौवें मामले में न्यायिक हिरासत मिली। शिरडी पुलिस ने भूमि धोखाधड़ी और निजी वित्तपोषण के मुद्दों के लिए हिरासत में लिया; जांच जारी है।