शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सेना, भाजपाच्या स्पर्धेत इतर पक्ष झाकोळले

By admin | Updated: February 24, 2017 01:44 IST

कार्यकर्त्यांचा जल्लोष : नाशिकच्या निकालाबरोबरच राज्याकडेही लक्ष

नाशिक : राज्यातील दहा महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांच्या कामगिरीकडेच संपूर्ण राज्याचे लक्ष असल्याने निवडणुकीतील इतर पक्षांची कामगिरी झाकोळून गेली आहे. नाशिकमध्येही केवळ सेना आणि भाजप या दोनच पक्षांच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे मनसे, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चाही होऊ शकली नाही. लहान पक्ष आणि इतर आघाड्यांचा तर या झंझावातात टिकाव लागू शकला नाही. महापालिका निवडणुकीत परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली होती. सेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतर राज्यात शिवसेना मोठा पक्ष असेल आणि नाशिकमध्येही शिवसेनाच सर्वाधिक जागा जिंकेल, असा अंदाज बांधला जात होता. परंतु जसाजसा निकाल हाती येऊ लागले तसतसे चित्र बदलत गेले आणि अखेरच्या निकालापर्यंत सेना-भाजप या दोहोंमधील रस्सीखेचकडेच सर्वांचे लक्ष वेधले गेले. नाशिकप्रमाणेच राज्यातील इतर महापालिकांमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याने भाजपाच्या या लक्षवेधी कामगिरीने सारेच अचंबित झाले. नोटाबंदी, मराठा मोर्चाकडून बहिष्काराची भाषा, तिकिटासाठीचा घोडेबाजार, प्रचारातील घसरलेला स्तर याचा कोणताही परिणाम भाजपाच्या निकालावर दिसला नाही. नाशिकमध्ये सेनेने ११२ तर भाजपाने ११९ जागांवर उमेदवार उभे केले होते. मनसे ९७, राष्ट्रवादीने ५४, बसपाने ३२, माकपने १४, भाकपने २, एमआयएमने ९, समाजवादी पार्टीने ३, भारिपने १४, रिपाइंने ८, रिपाइं सेक्युलरने ४, रासपने ५, आंबेडकर राइट पार्टीने २, संभाजी ब्रिगेडने २, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने ३, भारतीय संग्राम परिषदेने ६, जनसुराज्य पक्षाने १ तर भारतीय जनहित कॉँग्रेसने १ याप्रमाणे उमेदवार उभे केले होते. परंतु सेना- भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाची चर्चाच शहरात होऊ शकली नाही. राष्ट्रवादी आणि कॉँग्रसने यश संपादन केले आहे. राष्ट्रवादीने पाच तर कॉँग्रेसने सहा ठिकाणी विजय मिळविला. मात्र त्यांचा विजयही झाकोळला गेला. इतर पक्षांना आपल्या विजयापेक्षा सेना- भाजप यांच्या जागांमध्ये किती वाढ होते आणि सत्तेच्या जवळ कोण पोहचतो याचीच अधिक काळजी दिसून आली. वास्तविक राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस पक्षाचा विजय हा या पक्षांच्या नेत्यांपेक्षा स्थानिक उमेदवारांच्या प्रभावावरच झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाही मात्र पक्ष म्हणून या विजयाची फारशी दखल घेण्यात आली नाही.