नाशिक : नाशिक ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी गुरुवार (दि.२४) रात्री १२ वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार शस्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहेत.सदर निर्बंध लग्नकार्य, धार्मिक कार्यक्र म, आठवडे बाजार, अंत्ययात्रा आदींच्या जमावास लागू होणार नाही. त्याचप्रमाणे हा आदेश पोलीस अधिकारी व कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही लागू होणार नाही. मात्र सभा घेणेस, अगर मिरवणुका काढणेस संबंधित पोलीस विभागाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा दंडाधिकारी यांनी कळविले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}