शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यातील आरम नदीपात्रही होणार स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 13:44 IST

सटाणा:निसर्गाशी संबधित पंचतत्वावर आधारित उपाययोजना करुन शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्यासाठी शहरात पालिका प्रशासनातर्फे बुधवारपासून माझी वसुंधरा या अभियानास प्रारंभ ...

सटाणा:निसर्गाशी संबधित पंचतत्वावर आधारित उपाययोजना करुन शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्यासाठी शहरात पालिका प्रशासनातर्फे बुधवारपासून माझी वसुंधरा या अभियानास प्रारंभ करण्यात आला. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालिका क्षेत्रात " माझी वसुंधराअभियान राबविण्यात येत आहे . अभियानाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २३) शहरातील मोकळया जागा , उद्याने स्वच्छ करण्याकरिता विशेष मोहिम हाती घेण्यात आलेली आहे .  निमित्ताने नदीपात्र स्वच्छ करण्याची देखील मोहिम हाती घेण्यात आली असून यात जास्तीत लोकसहभाग घ्यावा असे आवाहन प्रभारी नगराध्यक्ष राकेश खैरनार यांनी केले आहे . • याप्रसंगी प्रशासन अधिकारी विजय देवरे , स्वच्छता निरिक्षक .माणिक वानखेडे , स्थापत्य अभियंता चेतन विसपुते , ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार , वाहन विभाग प्रमुख .संदिप पवार , सहा.स्वच्छता निरिक्षक किशोर सोनवणे , दिपक सोनवणे , प्रमोद गहिवड , दिनेश कचवे , धनंजय सोनवणे , तसेच उद्यान विभागातील व स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होते .
---------------------

काय आहे माझी वसुंधराअभियान
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पृथ्वी , वायु , जल , अग्नि आणि आकाश या निर्सगाशी संबधीत पंचतत्वावर आधारीत " माझी वसुंधरा अभियान " दिनांक २ ऑक्टोबर , २०२० ते ३१ मार्च , २०२१ या कालावधीत राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत . या अभियानाचा उद्देश निसर्गाशी असलेली कटिबध्दता निश्चित करण्यासाठी, निर्सगाशी संबधित पृथ्वी , वायु , जल , अग्नि आणि आकाश या पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे . पृथ्वी तत्वाशी संबधित वनीकरण , वनसंवर्धन , घनकचरा व्यवस्थापन , सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीकडे धुपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे. वायू तत्वाचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायूप्रदुषण कमी करुन हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे. निर्सगाच्या या पंचतत्वासोबत जीवन पध्दती अंगिकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही . म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेवून हे अभियान राबविण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक