शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बंडूकाका बच्छाव यांचा अर्ज बाद

By admin | Updated: January 21, 2016 23:11 IST

बंडूकाका बच्छाव यांचा अर्ज बाद

मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत वाढू लागली असून, उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत शिवसेनेच्या पॅनल शिलेदारालाच धक्का बसला आहे.बाजार समितीचे माजी सभापती व शिवसेना पॅनलचे नेते प्रमोद ऊर्फ बंडूकाका बच्छाव यांचा अर्ज छाननीत अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांची काल रात्री उशिरापर्यंत एकच धावपळ सुरू होती. दुसऱ्या दिवशीही तालुकाभर याचीच चर्चा सुरू होती. बंडूकाका बच्छाव यांच्या पत्नी व्यापारी परवानाधारक असल्याच्या कारणावरून त्यांचा अर्ज बाद ठरला आहे. दरम्यान, या निर्णयाला जिल्हा उपनिबंधकांकडे आव्हान देण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. छाननी प्रक्रियेत जि. प. सदस्य सुरेश पवार यांच्यासह १८ जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले, तर २५८ अर्ज वैध ठरले.४ फेब्रुवारीपर्यंत माघारीची मुदत असून, २१ फेब्रुवारीला मतदान होऊन २२ रोजी मतमोजणी होणार आहे. बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल २७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर आता मैदानात २५८ अर्ज उरले आहेत. बंडूकाका बच्छाव, सुरेश पवार व भगवान मालपुरे यांच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्या. निवडणूक अधिकाऱ्यांनी हरकती दाखल करून घेत संबंधितांना सायंकाळी ६ वाजेपर्यंत बाजू मांडण्याची संधी दिली. मुदतीत आवश्यक कागदपत्रे दाखल करण्यात आली. बच्छाव यांच्या पत्नी ज्योती बच्छाव परवानाधारक व्यापारी असून, त्यांचा व्यापारी गटातील मतदार क्रमांक ६६९ आहे, तर सुरेश पवार हे स्वत: परवानाधारक असल्याने दोन्ही अर्ज अवैध ठरविण्यात आले.(प्रतिनिधी)