शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

‘त्या’ खुनातील चौघांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 1:02 AM

बहिणीशी प्रेमसंबंध ठेवल्याचा राग मनात धरून जुने नाशिकमधील डिंगरअळी संभाजी चौकात शनिवारी (दि.९) मध्यरात्री एका युवकाला धारधार शस्त्राने ठार मारणाऱ्या चौघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

नाशिक : बहिणीशी प्रेमसंबंध ठेवल्याचा राग मनात धरून जुने नाशिकमधील डिंगरअळी संभाजी चौकात शनिवारी (दि.९) मध्यरात्री एका युवकाला धारधार शस्त्राने ठार मारणाऱ्या चौघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्यानंतर रात्रीतूनच संशयित हल्लेखोर त्रिकुटांनी मुंबई गाठली होती, तर एक हल्लेखोर शहरातच पोलिसांच्या हाती लागला होता. या खुनाचे कारण केवळ पूर्ववैमनस्य असून, प्रथमदर्शनी तरी कुठल्याहीप्रकारचे टोळीयुद्ध दिसत नसल्याचे उपआयुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी, २०१६ साली पंचवटी कॉलेजसमोर राहुल टाक नावाच्या युवकाची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली होती. त्या गुन्ह्याची आणि शनिवारी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी व कारण समान असल्याचे पोलिसांनी सांगितले.सुशांतला पोलिसांनी जुन्या नाशकातच बेड्या ठोकल्या तर रविवारी पहाटे सहायक निरीक्षक राकेश हांडे, उपनिरीक्षक डी. बी. मोहिते, व्ही. एस. जोनवाल यांच्या पथकाने मुंबई येथून अन्य त्रिकुटांना ताब्यात घेतले. सुशांत वाबळे याच्या तडीपार प्रस्तावाची चौकशी सुरू असल्याची तांबे यांनी सांगितले. त्याला यापूर्वी नोटीसदेखील बजावण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत (दि.१२) पोलीस कोठडी सुनावली आहे.गोळीबाराच्या गुन्ह्यात संशयित आरोपी सुशांत कैलास वाबळे (रा. म्हसरूळ टेक, जुने नाशिक) याचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला होता. तो या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला असताना त्याने पुन्हा संभाजी चौकात संशयित आरोपी शुभम उर्फ शंभू गोरख जाधव, शिवा गोरख जाधव (२०,दोघे रा. रा.जाधव वाडा, मरीटेक, जुनेनाशिक), भूषण जगदीश शिंदे (रा.हिरावाडी, पंचवटी) यांच्या मदतीने विवेक सुरेश शिंदे याचा धारधार शस्त्रांनी खून केला.

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी