शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दिवसभरात ५७ कोरोनाबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 01:44 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागात आता गंभीर अवस्था असल्याचे दिसत आहे. दिवसभरात कोरोनामुळे तब्बल  ५७ जणांचा मृत्यू झाले आहे. त्यातील ४३ रुग्णांचा मृत्यू ग्रामीण भागात झाले आहे. या मृत्युंमुळे जिल्ह्यात वर्षभरात कोरोना बळींची संख्या तीन हजार पार गेली आहे. 

ठळक मुद्देधक्कादायक : कोराेना बळींचा आकडा तीन हजार पार; ५ हजार नवीन बाधित

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागात आता गंभीर अवस्था असल्याचे दिसत आहे. दिवसभरात कोरोनामुळे तब्बल  ५७ जणांचा मृत्यू झाले आहे. त्यातील ४३ रुग्णांचा मृत्यू ग्रामीण भागात झाले आहे. या मृत्युंमुळे जिल्ह्यात वर्षभरात कोरोना बळींची संख्या तीन हजार पार गेली आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदा कोराेनाची लाट मोठी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असून, नाशिकमध्ये संसर्ग वेगाने पसरतोच आहे, परंतु त्याचबरोबर मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. एप्रिल महिन्यात तर एका दिवसात तीसपेक्षा कमी मृत्यू झाल्याची अपवादानेच नोंद आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि.२०) एकाच दिवसात ५७ बळींची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे बाधितांची संख्या शहरात जास्त असली तरी ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. नाशिक शहरात नऊ, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात तीन रुग्ण दगावले, तर उर्वरित ग्रामीण भागात ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा बाह्य दोन जणांचादेखील मृत्यू झाला आहे. मृत्यूची वाढलेली आकडेवारी नाशिककरांच्या चिंतेत भर घालणारी ठरली आहे. ३ हजार १६८ रुग्ण बरेदिवसभरात ५ हजार ५ इतके नवे रुग्ण आढळले असून, यात नाशिक शहरातील २ हजार ७७७, तर ग्रामीण भागातील २ हजार १६७ बाधितांचा समावेश आहे. मालेगाव येथील २१ आणि जिल्हाबाह्य ४० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ३ हजार १६८ रुग्ण बरे झाल्याचीही नोंद झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू