शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माजी महापौर वाघ, घोलपांसह ४२ नगरसेवकांचा पराभव

By admin | Updated: February 24, 2017 01:33 IST

नेतापुत्र नाकारले : सातपूरला प्रेम- अमोल पाटील, गाजलेल्या पवन पवार, लोंढेंनाही झटका

नाशिक : अनेक नाट्यमय घडामोडींनी गाजलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. मनसेचे प्रथम महापौरपद भूषवून पक्ष बदल करणाऱ्या अ‍ॅड. यतिन वाघ यांना तसेच शिवसेनेच्या माजी महापौर नयना घोलप यांना पराभवाचा धक्का देण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांच्या पुत्रांना नाकारत मतदारांनी निवडणूक रिंगणातील ४२ नगरसेवकांनाही घरी बसवले आहे. तर वादग्रस्त ठरलेल्या पवन पवार, तसेच सातपूरमधील प्रकाश लोंढे यांनाही झटका देण्यात आला आहे.नाशिकमध्ये यंदाची निवडणूक अनेक घटनांनी गाजली. मनसेचे प्रथम महापौरपद भूषविणाऱ्या अ‍ॅड. यतिन वाघ यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली असली तरी त्यांना मतदारांनी पराभूत करीत राष्ट्रवादीचे नेते गजानन शेलार यांना निवडून दिले. या पंचवार्षिक पूर्वी महापौरपद असलेल्या शिवसेनेच्या महिला महापौर नयना घोलप यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यांना भाजपाच्या सरोज अहिरे यांनी पराभूत केले, तर त्यांच्या भगिनी तनुजा घोलप यांना भाजपाच्याच कोमल मेहरोलिया यांनी पराभूत केले. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते माजी मंत्री बबन घोलप यांच्या या दोन्ही कन्या असून, आमदार योगेश घोलप यांच्या त्या भगिनी आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे गाजलेल्या नाशिकरोड येथील पवन पवार यांना भाजपाने उमेदवारी नाकारली असल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तथापि, भाजपाच्या अधिकृत उमेदवाराने त्यांचा पराभव केला आहे. अशाच प्रकारे वादग्रस्त ठरलेले आणि भाजपाने युतीही न केलेले रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश लोंढे यांना प्रभाग नऊमधून नाकारत मतदारांनी भाजपाच्या एका सामान्य कार्यकर्त्याला विजयी केले आहे.या निवडणुकीत एकूण ४२ नगरसेवकांना पराभूत व्हावे लागले असून, त्यात महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या तथा राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रा. कविता कर्डक तसेच मनसेचे गटनेते तसेच महापालिका निवडणुकीत पक्षाचे प्रवक्ता ठरलेले अनिल मटाले यांनादेखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. २००७ मधील मनपा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले द्वारका परिसरातील शिवसेना नगरसेवक सचिन मराठे यांना नवख्या प्रथमेश गिते यांनी पराभूत केले आहे.