शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

३५०० गृहनिर्माण सोसायट्या बरखास्त

By admin | Updated: January 5, 2016 22:03 IST

३५०० गृहनिर्माण सोसायट्या बरखास्त

नाशिक : राज्यातील गृहनिर्माण म्हणजेच हौसिंग सोसायट्यांचे सर्वेक्षण करण्याच्या नावाखाली सहकार खात्याने चालविलेल्या मोहिमेत नाशिक तालुक्यातील सुमारे साडेचार हजार सोसायट्यांपैकी साडेतीन हजार सोसायट्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी ही कारवाई करण्यात आल्याने सोसायटीधारक अडचणीत आले आहेत. राज्य शासनाने या सोसायट्यांना किमान ३१ मार्चपर्यंत लेखापरीक्षणासाठी मुदतवाढ द्यावी, यासाठी हौसिंग सोसायटी बचाव समिती पुढे आली असून, सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.राज्यातील नव्या भाजपा सरकारने सत्तेवर आल्यानंतर सहकारी सोसायट्यांकडे वक्रदृष्टी केली आहे. राज्यातील सर्व सोसायट्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश गतवर्षी देण्यात आले.त्यांचे सर्वेक्षण करताना आॅडिट आणि अन्य अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले आणि त्यासंदर्भात नोटिसा देण्याचे ठरले, परंतु नाशिकचाच विचार केला तर सोसायट्यांना घरपोच नोटिसा बजावण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसल्याने अडचण झाली.काही सोसायट्यांना पत्र मिळाले तर काहींना सुनावणीच्या आदल्या दिवशी मिळाल्याने कागदपत्रांची तयारी करता आली नाही आणि इतकेच निमित्त करून नाशिकमधील चार हजार ७७१ पैकी तीन हजार ६५९ सोसायट्या १ जानेवारीस बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोसायट्यांचे धाबे दणाणले आहे. अनेक मागासवर्गीय सोसायट्यांना शासकीय भूखंड मिळाले आहेत. ते भूखंड परत घेणार आहेत काय, असा प्रश्न आहे. काही सोसायट्या आणि सभासदांची कर्जप्रकरणे असून, त्यांना त्यामुळे अडचण झाली आहे. तर काही सोसायट्यांचे रंगकाम आणि अन्य कामे सुरू असून ती अर्धवट ठेवण्याची वेळ आली आहे. काही सोसायट्यांचे विक्री व्यवहार तर सदनिका किंवा बंगले घेऊ इच्छिणाऱ्यांचे गृहकर्ज अडचणीत आले आहेत. विक्री व्यवहारावरही मर्यादा आल्या आहेत. यासंदर्भात भाकप प्रणित हौसिंग बचाव समितीने अगोदरच सोसायट्यांना लेखापरीक्षणासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. ती पूर्ण न झाल्याने शनिवारी नाशिक येथे आयटकचे राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी अ‍ॅड. राजपाल शिंदे, संजय श्रीमाळ, संजय वाघ, अशोक डांगळे, शांताराम गांगुर्डे, विजय भालेराव, आर. डी. पाटील, पद्माकर इंगळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)