शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३२८ मद्यविक्री दुकाने होणार बंद

By admin | Updated: March 30, 2017 00:56 IST

नाशिक : सर्वोेच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बिअरबार व रेस्टॉरंटमधील मद्यविक्रीला दिलासा देत, वाइन शॉपवरील बंदी कायम ठेवल्याने जिल्"ातील ३२८ दुकाने बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले

नाशिक : सर्वोेच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बिअरबार व रेस्टॉरंटमधील मद्यविक्रीला दिलासा देत, वाइन शॉपवरील बंदी कायम ठेवल्याने जिल्"ातील ३२८ दुकाने कायमची बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, मार्चअखेर पाहता येत्या दोन दिवसांत ७९९ परवान्यांचे नूतनीकरण करावे लागणार आहे.  सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटरच्या आत असलेल्या सर्व प्रकारच्या मद्यविक्रीची ठिकाणे बंद करण्याचा आदेश दिल्याने जिल्"ातील सुमारे ६० टक्के मद्यविक्रीच्या दुकानांवर गंडांतर आले होते. न्यायालयाचा आदेश असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क खात्याने राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम खात्याकडून राष्ट्रीय व राज्य महामार्गावर असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानांचे अंतरही मोजून घेतले. परंतु दोन आठवड्यापूर्वी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केल्याने न्यायालयाने बिअरबार व रेस्टॉरंटला या निर्णयातून वगळले मात्र वाइन शॉप, बिअर शॉपी, देशी दारूच्या दुकानांना सूट देण्यास नकार दिल्याने नाशिक जिल्"ातील एकूण ११११ परवान्यांपैकी ३२८ मद्यविक्रीची दुकाने बंद होणार आहेत. सदर दुकाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटरच्या अंतरात थाटण्यात आली आहेत.  न्यायालयाचा निर्णय मात्र ७९९ रेस्टॉरंट व बिअरबारला लागू होणार नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आर. बी.  आवळे- पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील व त्यानंतरच  परवान्यांचे नूतनीकरण करण्यात  येणार असल्याचे आवळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नाशिक महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गाची मालकी त्या त्या यंत्रणेकडे असली तरी, त्याची देखभाल व दुरुस्ती महापालिका करीत असल्याने तसेच शहरी हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य मार्गाला पर्यायी नवीन मार्ग तयार झाल्याने जुन्या मार्गावरील दुकानांना न्यायालयाचा निर्णय लागू होण्याबाबतचा संभ्रमही दूर झाला असून, यासंदर्भात राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढून न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील अनेक दुकानांवर गंडांतर येणार आहे.