शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या मदतीला धावले युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 16:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. या संकट समयी अनेक नागरिक, स्वयंसेवी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. या संकट समयी अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था, होतकरू तरूण आपापल्या परीने मानवधर्म निभावून मदतीचे प्रयत्न करीत आहे. गरजुंना अन्नधान्याचे कीट वाटप, भुकेल्यांना भोजन वाटप तर असहाय्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे उपक्रम गेल्या ४० दिवसांपासून सुरू आहे. सर्वच क्षेत्र संकटात सापडले असतांना याचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे.मजुरांअभावी शेतातील पीक काढायचे कसे अशा विवंचनेत असलेल्या तालुक्यातील पिंप्री येथील एका शेतकºयाला गावातील युवकांनी विनामूल्य मदत करून शेतातील संपूर्ण कलिंगड कापणी करून देत समाजापुढे अनोखा आदर्श निर्माण केला आहे.पिंप्री, ता.शहादा येथील शेतकरी गणेश मणिलाल पाटील यांनी पाच एकर क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली होती. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या भितीने गावातील कोणीही शेतमजूर कलिंगड तोडण्यास तयार नव्हते. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले पीक वाया जाते की, काय अशी भिती होती. मात्र गावातील शेतकरी व लॉकडाऊनमुळे गावी आलेल्या तरूणांनी गणेश पाटील यांना मदत करण्याचे ठरविले आणि त्यांनी गणेश पाटील यांच्या कलिंगडचा ट्रक भरून दिला. यातून एकच संदेश जातो की, शेतकरी एकत्रित झाले तर सर्व शक्य आहे.एकीकडे शेतमजुरांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहेत. त्यात रोजगारासाठी परराज्यात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातच तालुक्यात शेतमजुरांचा प्रश्न नेहमीचाच डोकेदुखी आहे. त्यामुळे पिंप्री येथील एकतेच्या घटनेने गावोगावच्या तरूण शेतकºयांनी गट शेती योजना अंमलात आणणे काळाची गरज ठरली आहे. त्याशिवाय तरणोपाय नाही. शेतीप्रधान समाजाचामुळ शेतीनिष्ठ पाया शाबूत व मजबूत ठेवायचा असेल तर आज पिंप्रीकर तरूण बांधवांनी दाखविलेल्या सहकाराचा मुलमंत्र अन्य शेतकरी बांधवांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.लॉकडॉऊनमुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आता शेतमजुरांअभावी सुलतानी संकटाने हैराण झाला आहे. एरव्ही सातत्याने अस्मानी संकटाचा सामना करणाºया बळीराजास सामाजिक एकतेतून मदत करीत गावातील युवकांनी पुढाकार घेत शेतातील कलिंगड तोडून ट्रक ट्रॅक्टरमध्ये भरून सहाय्य केल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. 'एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या उक्तीनुसार पिंप्री ता.शहादा गावातील तरुणांनी एकत्रित येत केलेले हे मनुष्यबळाचे सहाय्य निश्चितच आदर्श व अनुकरणीय आहे. तसेच भविष्यातील गट शेतीला प्राधान्य देणारे आहे.