शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
3
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
4
लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांना पॅरोल मिळणं बंद होणार; पण कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते?
5
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
6
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
7
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
8
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
9
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
10
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
11
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
12
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
13
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
14
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
15
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
16
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
17
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
18
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
19
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
20
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार व आधार केंद्र सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील नागरिकांना विविध योजनाअंतर्गत लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने जिल्ह्यातील सर्व आपले सरकार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील नागरिकांना विविध योजनाअंतर्गत लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र व आधार केंद्रे सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.सर्व केंद्रातील उपकरणे नियमितपणे सॅनिटाईझर करावे. केंद्राच्या ठिकाणी सर्वांनी फेस मास्क/रुमाल वापरणे बंधनकारक राहील. केंद्राच्या ठिकाणी केंद्रचालक, आॅपरेटर यांना आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निदेर्शानुसार सोशल डिस्टंन्सीग, साबणाने हात धुणे व सॅनिटाईझर वापर करणे बंधनकारक राहील. केंद्रातील कर्मचा?्यांनी काम करतेवेळी नाक,तोंड, डोळे यांना स्पर्श करु नये.केंद्रात येणाºया सर्व नागरिकांनी व्यक्तीगत स्वच्छता पाळावी. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वेळी बायोमॅट्रीक उपकरणांचे वापरानंतर स्वच्छ करावे. एखाद्या व्यक्तीस खोकला, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यास अशा व्यक्तींस केंद्रावर येण्यापासून परावृत्त करावे. प्रत्येक केंद्रावर युआयडीएआयने दिलेल्या मार्गदर्शक सूचना केंद्राच्या दर्शनी भागात लावाव्यात.हॉटस्पॉटच्या ठिकाणी रहात असलेल्या कर्मचारी, नागरिक यांना अशा केंद्राच्या ठिकाणी जाण्यास मनाई राहील. पाचपेक्षा अधिक व्यक्ती केंद्रावर जमा होणार नाही याची जबाबदारी संबंधित केंद्र चालकाची राहील. ज्या क्षेत्रात कन्टेमेंन्ट झोन लागू असेल किंवा करण्यात येईल अशा क्षेत्रातील केंद्रे बंद राहतील. वरील सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येवून केंद्र सुरुळीतपणे सुरु ठेवण्यात यावेत.सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.सध्या शेतकºयांना पीक कर्जासाठी कागदपत्रांची गरज लागत आहे. या आदेशामुळे त्यांची सोय होणार आहे.आधार व आपले सरकार केंद्रात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना राहतील.