शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: चार तासांच्या चर्चेनंतर मजुरांना राज्यात प्रवेश; प्रशासनाची धांदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 05:40 IST

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये चार तास खल चालल्यानंतर सरकारच्या आदेशान्वये अखेर मजुरांना जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश मिळाला.

रमाकांत पाटील नंदुरबार : लॉकडाऊनमुळे गुजरातमध्ये अडकून पडलेले सुमारे एक हजारांपेक्षा अधिक मजूर मंगळवारी अचानक महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन धडकल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. या मजुरांना महाराष्ट्रात प्रवेश द्यावा की नाही याबाबत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये चार तास खल चालल्यानंतर सरकारच्या आदेशान्वये अखेर मजुरांना जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश मिळाला. दरम्यान, या सर्व मजुरांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी २५ हजारांपेक्षा अधिक मजूर गुजरातमध्ये रोजगारासाठी हंगामी स्थलांतरित होतात. ते सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये जातात व मार्चनंतर टप्प्याटप्प्याने गावी परततात. संचारबंदीत मजुरांना अनेक अडचणी होत्या. त्याचे व्हिडीओ त्यांनी त्यांच्या भागातील कार्यकर्त्यांना पाठवले. त्यावर महाराष्टÑ शासनाने देखील गंभीरपणे विचार सुरू केला होता. मंगळवारी सकाळी अचानक मजूर सीमेवर येताच पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी त्यांना थांबविले. काही अधिकाºयांनी त्यांनी गुजरातमध्ये पुन्हा जाण्यासाठी प्रयत्न केला. पण गुजरात प्रशासनाने नकार दिला. हा विषय थेट पालकमंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्यापर्यंत गेला. चर्चेनंतर या मजुरांना महाराष्टÑाच्या सीमेत येऊ देण्याचा निर्णय झाला.र्>आरोग्य तपासणी : मजुरांची आमलाड (ता़ तळोदा) येथे वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्यांना गावाकडे रवाना करण्यात आले.>गुजरात व मध्य प्रदेशातून वाहनाने येणाºया कुठल्याही व्यक्तीला जिल्ह्यात परवानगी नाही. जे लोक पायी येत आहेत त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना स्थानिकांकडून घरी सोडण्यात येत आहे. मानवतेच्या भूमिकेतून पायी चालत आलेल्या लोकांची तपासणी करून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. - डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस