कोरोना काळातही कामगार कल्याणतर्फे कामगारांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST2021-02-21T04:59:01+5:302021-02-21T04:59:01+5:30

नंदुरबार : लॅाकडाऊनच्या काळात कामगार कल्याण केंद्राच्या नंदुरबार व शहादा कार्यालयाने विविध आस्थापनांमध्ये अडकलेल्या कामगारांच्या सोयी-सुविधांबाबत सर्व्हे केल्याने आस्थापनांना ...

Workers benefit from workers' welfare even during the Corona period | कोरोना काळातही कामगार कल्याणतर्फे कामगारांना लाभ

कोरोना काळातही कामगार कल्याणतर्फे कामगारांना लाभ

नंदुरबार : लॅाकडाऊनच्या काळात कामगार कल्याण केंद्राच्या नंदुरबार व शहादा कार्यालयाने विविध आस्थापनांमध्ये अडकलेल्या कामगारांच्या सोयी-सुविधांबाबत सर्व्हे केल्याने आस्थापनांना कामगारांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागल्या होत्या. आता विविध योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्रातर्फे व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

जिल्ह्यात शहादा व नंदुरबार ही दोन कामगार कल्याण केंद्र आहेत. या केंद्राअंतर्गत कामगार कल्याणच्या विविध योजना राबविल्या जाऊन कामगार व त्यांच्या पाल्यांना लाभ दिला जातो. कोरोना काळात अर्थात लाॅकडाऊनमध्ये साखर कारखाने, सूतगिरणी, लहान, मोठी आस्थापने, एसटी आगार या ठिकाणी अडकलेल्या कामगारांना आवश्यक सुविधा मिळतात काय? याचे सर्वेक्षण केले गेले होते. त्याचा चांगला फायदा कामगारांना झाला होता. या काळात योजनांची अंमलबजावणी बंदच ठेवली गेली होती.

नोव्हेंबर महिन्यापासून केंद्राअंतर्गत विविध योजनांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. त्यांना कामगार वर्गाकडून चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे.

Web Title: Workers benefit from workers' welfare even during the Corona period