शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलचे मुल्यांकन थांबल्याने कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोना महामारीमुळे केंद्र शासनाकडून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका तळोदा तालुक्यातील साधारण चार हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोना महामारीमुळे केंद्र शासनाकडून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका तळोदा तालुक्यातील साधारण चार हजार घरकुल लाभार्र्थींना बसला असून, यामुळे घरकुलांचे पुढील मूल्यांकन होऊ शकले नाही. त्यामुळे पैशांअभावी कामच रखडल्याचे लाभार्थी सांगतात. आता शासनाने नियमात शिथिलता दिल्यामुळे तातडीने मूल्यांकन करण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तळोदा तालुक्यात सन २०१९-२० मध्ये साधारण ४०८७ घरकुले मंजूर करण्यात आले आहे. एक लाख ३८ हजारांचे हे घरकुल आहे. त्यात १८ हजार रूपयांचे अनुदान रोजगार हमी योजनेतून दिले जात असते. शासनाकडून पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाल्यानंतर संबंधीत लाभार्र्थींनी घरकुलाचे कामदेखील युद्धपातळीवर केले आहे. कुणी लेंटल लेवळपर्यंत तर पायाच्यावर कामे केली आहेत. परंतु मार्च महिन्यात आपल्या देशाबरोबरच कोरोना या वैश्विक महामारीने आपले पाय पसरविणे सुरू कल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने साधारण दीड महिन्यापासून वाहतुकही पूर्णपणे बंद केल्यामुळे काम धंदेच बंद झाले. या लॉकडाऊनचा फटका तळोदा तालुक्यातील चार हजार घरकुलांना सुद्धा बसला आहे. आता सातत्याने बांधकाम व्यवसायांना लॉकडाऊनमधून शिथिलता दिली आहे. तथापि घरकुलांच्या पुढील मूल्यांकन न झाल्यामुळे लाभार्र्थींना पुढील रक्कन मिळाली नसल्यामुळे नाईलाजास्तव बांधकाम बंद करावे लागल्याचे सांगितले. ज्यांच्याकडे थोडीफार पुंजी होती. त्यांनी घरकुलात वापरून मोकळे झाले आहेत. पुढील पावसाळ्याचे काम कसे पूर्ण करायचे अशी चिंता सतावत असल्याचेही काही लाभार्र्थींनी बोलून दाखविली. प्रशासनाने युद्ध पातळीवर घरकुलांच्या पुढील मूल्यांकनाच्या प्रक्रियेसाठी संबंधत अभियंत्यांंना सूचना द्याव्यात. जेणे करून पुढील रक्कमही शासनाकडून तातडीने मिळविता येईल, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे.दरम्यान, घरकुलांच्या रखडलेल्या मूल्यांकणाबाबत पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता कॉट्रॅक्टवरील कर्मचारी पर जिल्ह्यातील होते. लॉकडाऊनमुळे वाहतूकच बंद असल्याने ते येवू शकले नाही. नवीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांंना घरांचे मूल्यांकन करण्याबाबत सूचना दिल्या असून, दोन दिवसांपासून प्रत्यक्षात कामदेखील सुरू झाल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर घराची मूल्यांकणाची प्रक्रिया झाल्याबरोबर पुढील कार्यवाही सुद्धा तातडीने करण्यात येईल.प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घरकुलांचे काम युद्ध पातळीवर सुरू करून ते लेंटर लेव्हलपर्यंत आले आहे. परंतु कोरोनाच्या महामारीने केलेल्या लॉकडाऊनमुळे ते रखडले आहे. आता नियमात शासनाने सूट दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता मूल्यांकणाची कार्यवाही करावी. मला तिसरा व चौथा हप्ता मिळालेला नाही. पावसाळ्यापूर्वी घरकुल कसे पूर्ण होईल याची चिंता सतावत आहे. -जयेंद्र कांतीलाल पाडवी, लाभार्थी, तळवे, ता.तळोदा