तळोदा येथे नगरसेवकांकडून कन्या जन्माचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST2021-03-21T04:28:32+5:302021-03-21T04:28:32+5:30

गेल्या वर्षी कोविडच्या वैश्विक महामारीमुळे हा उपक्रम त्यांना राबविता आला नव्हता. त्यामुळे २०१९-२० व २०-२१ या ...

Welcoming the birth of a daughter by the corporators at Taloda | तळोदा येथे नगरसेवकांकडून कन्या जन्माचे स्वागत

तळोदा येथे नगरसेवकांकडून कन्या जन्माचे स्वागत

गेल्या वर्षी कोविडच्या वैश्विक महामारीमुळे हा उपक्रम त्यांना राबविता आला नव्हता. त्यामुळे २०१९-२० व २०-२१ या दोन्ही वर्षात प्रभाग दोनमध्ये जन्माला आलेल्या कन्यारत्न व मातांच्या सन्मानाचा एकत्र कार्यक्रम घेण्यात आला. या वर्षात प्रभाग दोनमध्ये जन्मलेल्या कन्या व जन्मदात्या मातांसाठी स्त्रीजन्माचे स्वागत आणि मातृवंदन सत्कार सोहळ्याचे आयाेजन करण्यात आले होते. या सोहळ्यात एकूण ६४ चिमुकल्या बालिकांचा व त्यांच्या आईचा भेटवस्तू, खेळणी आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यासाठी येणारा सर्व खर्च दोन्ही नगरसेवकांनी स्वखर्चाने केला असून, यापूर्वीदेखील २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा ३० बालिका व त्यांचा मातांचा सत्काराचा कार्यक्रम या नगरसेवकांकडून घेण्यात आला होता. कन्या जन्माचे स्वागत व बेटी पढाओ, बेटी बचाओ ही संकल्पना समाजात रुजविण्यासाठी या नगरसेवकांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप परदेशी, योगेश मराठे, तळोदा-शहादा मतदारसंघाचे काँग्रेस समन्वयक, तळोदा तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष महेंद्र कलाल, भरत चौधरी, तळोदा युवक काँग्रेस सचिव आदिल शेख, कमलेश पाडवी, धर्मराज पवार, इमरान सिकलिकर, प्रकाश पाडवी आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Welcoming the birth of a daughter by the corporators at Taloda