डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांची रुग्णालयांना भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:18 IST2019-12-18T12:18:21+5:302019-12-18T12:18:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या शहादा येथ्ील इन्स्टिट्युट आॅफ फार्मसीच्या (डी.फार्मसी) द्वितीय वर्षाच्या ...

Visit to hospital for students of D.Pharmacy | डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांची रुग्णालयांना भेट

डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांची रुग्णालयांना भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या शहादा येथ्ील इन्स्टिट्युट आॅफ फार्मसीच्या (डी.फार्मसी) द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शहादा येथील रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णालयात कशा पद्धतीने काम केले जाते याबाबत माहिती जाणून घेतली.
पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना रुग्णालयातील कामकाजाविषयी ज्ञान मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. डी.फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी हे रोजगाराच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) म्हणून कार्यरत होतात. त्यावेळी त्यांना अडचणी यायला नको व काम कसे करावे तसेच विभागनिहाय कामाचे स्वरूप कसे असते आदी विषयांना लक्षात घेऊन शहादा येथील सुश्रुत नर्सिंग होम आणि व नगरपालिकेच्या रुग्णालयात भेट दिली. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन पटेल, डॉ.के.जे. पाटील, डॉ.रुपल गिरासे, क्षयरोग विभाग प्रमुख मेघा खारकर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नगरपालिकेच्या रुग्णालयातील विभागानुसार सर्व विभागांची माहिती जाणून घेतली.
सुश्रुत नर्सिंग होमचे डॉ.बी.डी. पटेल, डॉ.मनवानी, डॉ.राजूभाई पाटील यांनी त्यांच्या रुग्णालयातील आधुनिक आरोग्य सेवा प्रणाली व साहित्यांची ओळख करून दिली. या उपक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, मानद सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, समन्वयक पी.आर. पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. उपक्रमासाठी डी.फार्मसीच्या रुग्णालय भेट विभाग प्रमुख प्रा.ज्योत्स्ना खेडकर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Visit to hospital for students of D.Pharmacy