विवाहाचे अमिष देत युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 11:59 IST2019-12-18T11:59:17+5:302019-12-18T11:59:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील रायसिंगपुरा भागातील अल्पवयीन युवतीला लग्नाचे अमिष देत एकाने पळवून नेले होते़ यादरम्यान संशयिताने ...

Violence against a woman giving her marriage | विवाहाचे अमिष देत युवतीवर अत्याचार

विवाहाचे अमिष देत युवतीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील रायसिंगपुरा भागातील अल्पवयीन युवतीला लग्नाचे अमिष देत एकाने पळवून नेले होते़ यादरम्यान संशयिताने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे़
मध्यप्रदेशातील बºहाणपूर येथील रहिवासी अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली होती़ दरम्यान २४ सप्टेंबर रोजी याच परिसरात राहणाऱ्या तेजस जगदीश मराठे याने तिला लग्नाचे अमिष देत पळवून नेले़ यादरम्यान त्याने तिला पुणे येथे घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला होता़ यात तेजस यास अनिल मधुकर मराठे, सागर ऊर्फ दिगंबर मराठे दोघे रा़ रायसिंगपुरा यांनी मदत केली होती़ फसवणूक झाल्याचे समजून आल्यानंतर युवतीने परत येऊन कुटूंूबियांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलीसात धाव घेतली़ पिडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित तेजस जगदीश मराठे, अनिल मराठे, सागर मराठे यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Violence against a woman giving her marriage