शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात पडून असलेल्या व्हेंटिलेटरची धूळ झटकण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

नंदुरबार जिल्ह्यात २० व्हेंटिलेटर ग्रामीण भागात वापराविना लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत ...

नंदुरबार जिल्ह्यात २० व्हेंटिलेटर ग्रामीण भागात वापराविना

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर रुग्णांकरिता व्हेंटिलेटरची मागणी वाढली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आता दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालयात पडून असलेले २० व्हेंटिलेटर नवापूर व तळोदा येथील ग्रामीण रुग्णालयात आणून वापर सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

नंदुरबार जिल्हा तसा आरोग्य सेवेबाबत तोकडा आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या मार्च महिन्यापासून अचानक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या आठवडाभरापासून तर कोरोना रुग्णांची रोजची संख्या ६०० ते ८०० पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण असून, उपचारासाठी प्रशासनाचीही धांदल उडाली आहे. विशेषत: व्हेंटिलेटरबाबत परिस्थिती गंभीर आहे. बहुतांश रुग्ण खाजगी उपचारासाठी सुरत, नाशिक, अहमदाबाद, मुंबई, पुणे येथे जात असल्याने रुग्णांची विभागणी होते; पण रुग्णसंख्या वाढत असल्याने आता जिल्हा रुग्णालयाचा ताण मोठा वाढला आहे.

या आरोग्य केंद्रात व्हेंटिलेटर पडून

जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत प्रत्येकी १० व्हेंटिलेटर आले आहेत. हे व्हेंटिलेटर आता नवापूर आणि तळोदा या ग्रामीण रुग्णालयात आणून तेथे ते सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यापैकी दोन व्हेंटिलेटर शुक्रवारीच नवापुरात आणण्यात आले.

शनिवारी तळोदा येथे देखील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नवीन केंद्र सुरू करण्यात येत असून, त्या ठिकाणीही व्हेंटिलेटर मागविण्यात येणार आहे.

व्हेंटिलेटरसाठी तज्ज्ञ डाॅक्टरांची आवश्यकता असते. त्यासाठी नवापूर व तळोदा येथील डाॅक्टरांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २१५ आहे. त्यापैकी १५ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. इतर रुग्णांना आवश्यकता भासल्यास तात्काळ व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे.

व्हेंटिलेटर देता का व्हेंटिलेटर?

जिल्ह्यात एकूण ८४ व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी ६८ व्हेंटिलेटर शासकीय रुग्णालयात तर १६ व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयातील आहेत.

शासकीय ६८ व्हेंटिलेटरपैकी जिल्हा रुग्णालयातील ४८ व्हेंटिलेटर कार्यान्वित आहेत, तर इतर २० व्हेंटिलेटर स्थलांतरित करून कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

आजच्या स्थितीत रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे कागदावर दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र शासकीय रुग्णालय असो की खाजगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. अनेक वेळा सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना सुरत, पुणे, नाशिक, मुंबई येथे जावे लागत आहे. त्यामुळे कुणी व्हेंटिलेटर देता का, अशी मागणी रुग्णांची कायम आहे.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सध्या ४८ व्हेंटिलेटर असून, इतर ठिकाणी २० व्हेंटिलेटर आहेत. हे २० व्हेंटिलेटर नवीन उभारण्यात येत असलेल्या कोरोना उपचाराच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी तज्ज्ञ अभियंता व तांत्रिक कर्मचारी मागविण्यात आले आहेत. याबाबत काही डाॅक्टरांनाही प्रशिक्षण देण्यात आले असून, आवश्यकता भासल्यास जिल्ह्यातील इतर ठिकाणीही ऐनवेळी व्हेंटिलेटर स्थलांतरित करून रुग्णाला उपचारासाठी उपलब्ध करून देऊ शकू, अशी तयारी आहे.

-डाॅ.रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार