शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या सूचनेने व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल यांच्या माध्यमातून नारी ...

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या सूचनेने व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल यांच्या माध्यमातून नारी सन्मान कार्यक्रम राबविण्यात आला. नंदुरबार शहरातील विविध शासकीय कार्यालयातील विविध पदांवर कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, ॲड.अश्विनी जोशी, शहर उपाध्यक्ष पंकज पाटील, राजा ठाकरे, ओबीसी सेल नंदुरबार शहराध्यक्ष सचिन सोनार, कुशल मोरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार

नंदुरबार शहरातील जिजामाता शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी भैरवी चित्ते, मेघना बैसाणे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा.संजय महाले यांनी महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.टी.ए. मोरे, प्रा.के.जी. सोनार होते. कार्यक्रमासाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डी.व्ही. सोनवणे यांनी परिश्रम घेतले. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अनंता देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थिनींसह विद्यार्थी उपस्थित होते.

नवापुरात स्वच्छतेचा जागर

नवापूर तालुक्यातील खेकडा, मोग्राणी, डोगेगाव, खडकीपाडा, थुवा या गावांमध्ये महिला दिनानिमित्त एन.एस.ई फाउंडेशन, सी.वाय.डी.ए. संस्था, फिनिश सोसायटी व स्वच्छ भारत मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी महिला शक्ती, वैयक्तिक स्वच्छता, हागणदरीमुक्त गाव याविषयी विविध खेळ व साधनांचा वापर करून मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी खेकडा गावातील महिलांनी प्रत्येक महिन्यातील ५ तारखेला गावात स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्धार केला. वाय.डी.ए. संस्थेचे कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर व गावातील युवती-महिला उपस्थित होत्या.