शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दोन गावे संविधान साक्षर ग्राम होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संविधान दिनाचे औचित्य साधून समतादूत प्रकल्पांतर्गत 26 नोव्हेंबर  पासून जिल्ह्यातील दोन गावांमध्ये एक महिना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संविधान दिनाचे औचित्य साधून समतादूत प्रकल्पांतर्गत 26 नोव्हेंबर  पासून जिल्ह्यातील दोन गावांमध्ये एक महिना संविधान विषयक जनजागृती करुन त्या गावातील प्रत्येक व्यक्तीला संविधान विषयी माहिती देण्यासाठी संविधान साक्षर ग्राम कार्यक्रम राबविण्यात येत आहे.कार्यक्रमांतर्गत गावाची निवड, गाव पाहणी, गावाचा सुक्ष्म आराखडा तयार करणे, गावचा नकाशा तयार करणे आदी प्राथमिक तयारी करून सरपंच, पोलीसपाटील, आशावर्कर, अंगणवाडीवर्कर, गावातील शाळेतील मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना भारतीय राज्यघटनेचे महत्व, अंमलबजावणी, कायदे याविषयी थोडक्यात प्राथमिक माहिती देण्यात येणार आहे. शंभर टक्के संविधान साक्षरतेची गरज, प्रचार, प्रसार या विषयावर चर्चात्मक आराखडा तयार करून गाव बैठका घेण्यात येणार आहे. युवक-युवती, बचत गटातील महिला, शेतकरी गट, गावातील विविध तरुण मंडळ यांच्या विशेष बैठका, गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्याथ्र्यांसोबत विविध उपक्रम आदींच्या माध्यमातून संविधानाचे महत्व नागरिकांपयर्ंत पोहोचविण्यात येणार आहे. हस्तकला, चित्रकला, विविध स्पर्धा, गांडूळखत प्रकल्प, परसबाग, स्वच्छतेचे महत्व आणि रोज प्रास्ताविकेचे वाचनाची सवय लावणे आदी उपक्रमांचादेखील यात समावेश आहे. महिलांसोबत विशेष कार्यशाळा आयोजित करुन व्यसनमुक्ती, बचतीची सवय, आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्व, लेक वाचवा, वाढवा, शिकवा या विषयावर प्रबोधन कार्यशाळा, स्त्रीयांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढविणे, आरोग्य कॅम्प आयोजित करणे, गावस्वच्छता अभियान राबविणे, महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करणे, महाविद्यालयीन युवक-युवती यांच्या कार्यशाळा या उपक्रमांचादेखील कार्यक्रमात समावेश करण्यात येणार आहे.गावातील ग्रामपंचायत कमिटीसाठी पंचायत राज प्रशिक्षण राबविणे, गावातील सर्व जातीधमार्तील सर्व वयोगटातील लोकांना या उपक्रमात सहभागी करुन घेतले जाईल. विविध मान्यवर विचारवंत, भारतीय संविधानाचे अभ्यासक, लेखक यांना गावभेटीसाठी पाचारण करणे आदी माध्यमातून हा कार्यक्रम राबवावा, असे मुख्य प्रकल्प संचालिका समतादूत प्रकल्प, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी    सांगितले.    

भारतीय संविधान आणि मुलभूत अधिकार या विषयावर त्या त्या विभागातील शासकीय अधिकारी वक्ते म्हणून राहतील. तसेच गावातील प्रत्येक घरात राज्यघटना देणे, प्रत्येक घरात भारतीय राज्यघटनेचे प्रास्ताविक भिंतीवर लावणे, शाळेमध्ये भारतीय संविधानाचे प्रास्ताविक लावणे रोज नियमित वाचन घेणे, भारतीय संविधान उद्देशिकेची कोनशिला तयार करण्यात येईल. गावाच्या सुरुवातीलाच ठळक भागात ती लावली जाईल.