शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नवापुर तालुक्यातील नवापाडा येथून अडीच लाखाचे सागवानी लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : तालुक्यातील नवापाडा येथून वनविभागाने अडीच लाख रुपयांचे अवैध सागवानी लाकूड आणि सुतारकामाचे साहित्य ताब्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : तालुक्यातील नवापाडा येथून वनविभागाने अडीच लाख रुपयांचे अवैध सागवानी लाकूड आणि सुतारकामाचे साहित्य ताब्यात घेतले़ मंगळवारी वनविभागाच्या पथकाने नवापाडा गावातील एका घरात धाड टाकून ही कारवाई केली़ गेल्या दोन महिन्यातील ही सहावी कारवाई आहे़नंदुरबार वनविभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना नवापाडा गावातील एका घरात अवैध सागवानी लाकूड आणि फर्निचर बनवण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी पथकासह याठिकाणी धाड टाकली असता, सागवान आणि शिसम लाकडासह सुतारकामाचे साहित्य मिळून आले़ यावेळी वनक्षेत्रपाल आऱबी़पवार यांच्यासह नंदुरबार आणि नवापुर रेंजचे वनपाल पी़बी़ मावची, आऱबी़जगताप, एम़जे़मडलीक, पी़एस़पाटील, उपस्थित होते़ वनविभागाने घेतलेल्या झडतीदरम्यान याठिकाणी ताजा तोडीचे साग, सिसम, पायउतराई, तयार सोफा, सिसमच्या सेट, रंधा मशिन, सुतार साहित्य असा दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला़ जप्त करण्यात आलेले लाकूड भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ५२ अन्वये नवापुर येथील शासकीय विक्री आगारात जमा करण्यात आले़ याप्रकरणी कामोद ता़ नवापुर येथील वनपालांनी नवापाडा येथील संशयिताविरोधात वनगु्न्हा दाखल केला आहे़नवापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यात शेतकऱ्यांनी शेतात लावलेले साग आणि शिसमचे झाड तोडून त्याच्या लाकडांची तस्करी सुरु झाली आहे़ दिवसेंदिवस वाढणाºया या प्रकारांवर आळा घालण्यासाठी वनविभागाकडून सातत्याने कारवाई सुरु आहे़ गेल्या दोन महिन्यात सहा कारवाया करुन लाखो रुपयांचा लाकूड साठा जप्त करण्यात आला आहे़ वनविभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनात पथकाने नवापाडा येथे कारवाई केली़दरम्यान तस्करांच्या कारवायांवर आळा घालण्यासाठी वनविभाग स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या संपर्कात असून त्यांनी लाकूडतोड करणाऱ्यांची माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे़यासाठी तालुक्यातील विविध भागात वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी भेटी देत आहेत़नवापूर, चिंचपाडा, नंदुरबार वनक्षेत्रात साग, शिसम आणि खैरची तोड थांबवून त्याची तस्करी रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देत असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली आहे़