जाधव शैक्षणिक संकुलातर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:19 IST2021-07-03T04:19:59+5:302021-07-03T04:19:59+5:30

संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव व सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव, हिमांशू जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. त्यानंतर ...

Tree planting by Jadhav Educational Complex | जाधव शैक्षणिक संकुलातर्फे वृक्षारोपण

जाधव शैक्षणिक संकुलातर्फे वृक्षारोपण

संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव व सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव, हिमांशू जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. त्यानंतर वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय, शारदा कन्या विद्यालय, वसंतराव नाईक वरिष्ठ महाविद्यालय व महिला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले. या वेळी सुमारे २०० रोपे लावण्यात आली. त्यासाठी मोठ्या आकाराचे खड्डेही खोदण्यात आले होते. वृक्षारोपणानंतर वृक्ष संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न केला जाईल, असा संकल्प करण्यात आला.

या वेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. पाटील, महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य भारत चाळसे, वसंतराव नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. मोरे, उपप्राचार्य आर.जे. रघुवंशी, उपमुख्याध्यापक जे. एम. पाटील, पर्यवेक्षक ए. डी. खेडकर, संजय बोरसे, एन. बी. कोते, वनविभागाचे वरिष्ठ लिपिक एन. डी. गिरासे उपस्थित होते. वनक्षेत्रपाल एस. के. खुणे यांचे सहकार्य लाभले.

शारदा कन्या माध्यमिक विद्यालयातर्फे ‘आमचे अंगण - आमचे अस्तित्व’ या उपक्रमांतर्गत ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थिनींनी आपल्या अंगणात रोप लावले. प्रा. संजय जाधव व वर्षा जाधव यांनी विद्यार्थिनींना ऑनलाइन मार्गदर्शन केले. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त विद्यार्थिनींसाठी मुख्याध्यापिका एस. झेड. सैयद, पर्यवेक्षक एन. बी. कोते यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धाही घेण्यात आली.

Web Title: Tree planting by Jadhav Educational Complex