वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST2021-03-20T04:29:22+5:302021-03-20T04:29:22+5:30

प्रकाशा येथील तळोदा चौफुलीवर गुजरात हद्दीतून वाळू भरून शहादा, शिरपूर, धुळे, नाशिक, मुंबई, कल्याण, ठाणे, औरंगाबाद आदी ठिकाणी वाळू ...

Traffic congestion due to sand transport vehicles | वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा

प्रकाशा येथील तळोदा चौफुलीवर गुजरात हद्दीतून वाळू भरून शहादा, शिरपूर, धुळे, नाशिक, मुंबई, कल्याण, ठाणे, औरंगाबाद आदी ठिकाणी वाळू वाहतूक केली जाते. मोठमोठे डंपर व मालट्रक या वाहनांद्वारे ही वाळू वाहतूक केली जाते. येथील तळोदा चौफुलीवर नेहमी वाळूने भरलेल्या व रिकाम्या वाहनांची गर्दी असते. कधी कधी तर ४० ते ५० वाहने उभी राहतात. मध्यरात्रीनंतर ही वाहने रवाना होतात. सायंकाळच्यावेळी या वाहनांची जास्त गर्दी होते. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन इतर वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वास्तविक गुजरात हद्दीतील वाळूची महाराष्ट्र हद्दीतून वाहतूक करायची असेल तर शासनाच्या नवीन नियमानुसार १० टक्के रॉयल्टी महाराष्ट्राची भरणे आवश्यक आहे, असे सांगण्यात येते हा नियम कुठे गेला? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. या प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत असून येथील तळोदा चौफुलीवर थांबणाऱ्या या वाहनांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Traffic congestion due to sand transport vehicles