वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:27 IST2021-03-15T04:27:58+5:302021-03-15T04:27:58+5:30

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण गेल्या दोन-तीन वर्षांपासून बंद आहे. अनेक शिक्षक निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी वेतन ...

There will be online training for senior and selection category | वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण होणार

वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण होणार

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण गेल्या दोन-तीन वर्षांपासून बंद आहे. अनेक शिक्षक निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी वेतन श्रेणीसाठी पात्र आहेत. मात्र त्यांची प्रशिक्षणाची अट पूर्ण न झाल्यामुळे हा लाभ मिळण्यास मोठी अडचण येत होती. याबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने ऑनलाइन प्रशिक्षण सुरू करण्याबाबत शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे संचालक दिनकर मेटकर, दिनकर मेटकर यांच्याशी मंडळाने समक्ष निवेदन देऊन चर्चा केली होती. या मागणीनुसार शासनाने त्याची दखल घेऊन सर्व शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील जे शिक्षक वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीसाठी पात्र होते, परंतु प्रशिक्षणाअभावी त्यांना वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी देण्यात आली नाही. ३१ मार्च २०२१ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या अथवा झालेल्या शिक्षकांची संख्या आणि ३१ मे २०२१ अखेर वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीसाठी पात्र होते, मात्र प्रशिक्षण झालेले नाही अशा सर्व शिक्षकांची सांख्यिकी माहिती विहित नमुन्यात मागवली जात आहे. याबाबत राज्याध्यक्ष देवीदास बस्वदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य संघटक राजेंद्र निमसे, राज्य सल्लागार सुरेश भावसार, राज्य उपाध्यक्ष भगवान पाटील, मोहन बिसनारिया, अशोक देसले, किशोर चौधरी, ओजू पाडवी, फुलसिंग वसावे, महेंद्र बैसाणे, रवींद्र बैसाणे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: There will be online training for senior and selection category