शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या विकासासाठी सातत्य आणि परिश्रमांची जोड देणारा शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील बामडोद या छोटय़ाशा गावातील जिल्हा परिषदेची शाळा यंदा राज्यस्तरावर पोहोचली आह़े शाळेचे शिक्षक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील बामडोद या छोटय़ाशा गावातील जिल्हा परिषदेची शाळा यंदा राज्यस्तरावर पोहोचली आह़े शाळेचे शिक्षक आनंदराव संपतराव करनकाळ यांच्याकडून आठ वर्षे बालकांच्या सर्वागीण विकासासाठी केलेल्या सातत्यापूर्ण प्रयत्नातून हे शक्य झाले आह़े         आनंदराव करनकाळ यांना राज्य शासनाचा आदर्श पुरस्कार जाहिर झाला आह़े यातून एका शिक्षकाने आनंददायी शिक्षण देण्याच्या प्रयत्नाचे कौतूक झाले आह़े 2012 पासून खोंडामळी केंद्रातील सर्वात लहान अशा बामडोद जिल्हा परिषद शाळेत आनंदराव करनकाळ हे रुजू झाले होत़े बालकांचा सर्वागीण विकास या ध्येयाने पछाडलेले करनकाळ गुरुजी येथे रुजू झाले होत़े रुजू झाल्यानंतर विद्याथ्र्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबवत असताना त्यांना कुमठेबीट जि़ सातारा येथे जाण्याची संधी मिळाली होती़ येथील ज्ञानरचनावादी शिक्षण उपक्रमाची माहिती घेतली़ बामडोद येथे आल्यानंतर विद्याथ्र्यामध्ये वाचन वाढीसाठी पहिला प्रयत्न म्हणून भारतरत्न डॉ़ ए़पी़जे अब्दुल कलाम यांच्या नावाने ग्रामस्थांच्या सहभागाने विद्यार्थी वाचनालय सुरु केल़े इंग्रजी आणि गणितासाठी भरपूर साहित्य उपलब्ध असले तरी इतिहासासाठी साहित्य नसल्याचे त्यांनी हेरुन विविध चित्रसाहित्याची निर्मिती करुन इतिहास पटवून देण्यास प्रारंभ केला़ विद्याथ्र्याना चित्रांमधून इतिहासी ओळख झाल्याने त्यांच्यातील गुणवत्ता वाढीचा हा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला़ याचप्रकारे इतरही विषयांचे साहित्य निर्माण करत विद्याथ्र्याना त्याची माहिती देत राहिल्याने विद्याथ्र्याच्या प्रगतीला प्रारंभ झाला़ गत आठ वर्षात त्यानी बामडोद शाळेत राबवलेल्या उपक्रमांत लोकांचा सहभाग वाढवत मुलांची प्रगती त्यांच्यासमोर मांडली होती़ पालकांनी या प्रगतीचा वेग कायम ठेवला आह़े