शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिकांना विनामूल्य गावी पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने विनामूल्य सुविधा उपलब्ध करावी, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने विनामूल्य सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनही दिले. तसेच बडवाणी (मध्यप्रदेश) येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही केले.या संदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे देशात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. त्याचा सामना सरकारला करावा लागत आहे. त्या कार्यात आपलाही सहभाग असल्याचे स्पष्ट करून त्यांनी म्हटले आहे की, या परिस्थितीत देशातील गरीब श्रमिकांवर महासंकट कोसळले आहे. अन्न, निवारा या मुलभूत समस्यांपासूनही ते दुरावले आहे. त्यामुळे नाईलाजाने महानगरांमध्ये अडकलेले हे असुरक्षित श्रमिक आपापल्या गावी परतण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांना रोखले जात असल्याने लपून छपून ते गुन्हेगारांसारखे आपल्या गावीत वाटेल ते दाम देवून जात आहेत. काहीजण शेकडो किलोमीटर पायीच प्रवास करीत आहेत. या दगदगीत काहींचा रस्त्यांवरच मृत्यूही झाला आहे. हे चित्र देशासाठी व महाराष्टÑासाठीही लाजीरवाने असून, माणुसकीला कलंक लावणारे आहे.नुकताच शासनाने या अडकलेल्या मजुरांना घरी परतण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला असला तरी राज्या राज्यांमध्ये समन्वय नसल्याने व इतर तांत्रिक बाबींमुळे घरी परतण्यासाठी लोकांना प्रचंड अडचणी येत आहेत. ही बाब पाहता शासनाने या अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सुरक्षित व विनामूल्य व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. दरम्यान, याच मागणीसाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सोमवारी बडवाणी (मध्यप्रदेश) येथे २४ तासांचे लाक्षणिक आंदोलन केले.