शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नियंमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना मोफत तांदूळ वितरण करताना नियमांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना मोफत तांदूळ वितरण करताना नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिला आहे़ जिल्हा कार्यालयातील बैठकीत त्यांनी रेशन दुकानदारांसोबत संवाद साधत विविध सूचना दिल्या़कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात रास्त भाव दुकानदार संघटनांचे प्रतिनिधी, गॅस एजन्सी संचालक, केरोसीन अर्धघाऊक विक्रेत्यांची बैठक मंगळवारी घेण्यात आली़ बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अविशांत पांडा, वसुमना पंत, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्यासह सर्व तालुक्यांचे तहसीलदार अणि नायब तहसीलदार उपस्थित होते़ बैठकीत धान्य वाटपाचा आढावा घेण्यात आला.पुढे बोलताना डॉ.राजेंद्र भारुड यांनी सांगितले की, केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत तांदूळ उपलब्ध करून दिल्याने लभार्थीला एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंर्तगत अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे़ रास्त भाव दुकानदारांनी वाजवीपेक्षा जास्त दर आकारणी करू नये, एप्रिलमध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थींना नियमित नियतन वाटप होईल यासाठी ई-पॉस मशिनवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या मोफत तांदळाचे वाटप लाभार्थींना करण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या़

उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत लाभार्थींना मोफत सिलींडर देण्याच्या सूचना तसेच केरोसिन विक्रेत्यांनी केरोसिन वाटप करताना फोटो किंवा व्हिडीओद्वारे नोंद ठेवावी व पात्र लाभार्थींनाच केरोसिन मिळेल याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत केल्या़ बैठकीत मोफत वितरण केलेल्या धान्याची पावती दुकानदारांनी सांभाळून ठेवण्याबाबत पुरवठा विभागाने सूचना दिल्या़