शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनची कठोरतेने अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची कठोरतेने अंमलबजावणी करावी. नागरिकांना शिथिलता देताना प्रशासनाच्या सूचनांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची कठोरतेने अंमलबजावणी करावी. नागरिकांना शिथिलता देताना प्रशासनाच्या सूचनांचे पालन होईल याकडेही लक्ष द्यावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी दिले.पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करताना ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते.पालकमंत्री म्हणाले, बाहेरून येणारी व्यक्ती किती कालावधीसाठी व कोणाकडे येत आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करावा. अशा व्यक्तिमध्ये आजाराची लक्षणे असल्यास तातडीने विलगीकरणात पाठविण्यात यावे. आवश्यकतेनुसार कंत्राटी तत्वावर तत्काळ डॉक्टर नेमावे. तसेच गरज पडल्यास खाजगी डॉक्टरांची सेवादेखील घेण्यात यावी.नागरिकांमध्ये बºया प्रमाणात जागृती निर्माण झालेली आहे. मात्र शहरी भागात मास्क घालणे व शारीरीक अंतराचे कठोरतेने पालन होईल याकडे लक्ष द्यावे. विशेषत: बाजाराच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने अधिक दक्षता बाळगावी आणि कुठल्याही परिस्थीतीत संसर्ग वाढणार नाही. याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.नंदुरबार येथे कोरोना नमुने तपासण्यासाठी लॅब तयार करण्याबाबतदेखील अ‍ॅड.पाडवी यांनी आढावा घेतला. त्यासाठी आवश्यक यंत्राबाबत त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. लॅब सुरू झाल्यास सपर्क साखळीतील बाधीत व्यक्तींची ओळख लवकर होवून कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाºयांनी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी एकलव्य इंग्लिश स्कूल येथे भेट देऊन कोविड सेंटरच्या तयारीची माहिती घेतली. तेथे जनरेटरची व्यवस्था व वैद्यकीय कर्मचाºयांसाठी गिझरची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सर्व आवश्यक सुविधा तातडीने करण्यात याव्यात. यासाठी शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.जिल्ह्यात गेल्या चार दिवसात रूग्ण संख्या वाढल्याने प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी अधिकाºयांना कामाबाबत अधिक दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.