शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

एकमेव कोरोना टेस्टिंग लॅबवरील ताणही आता झाला कमी, ट्रूनेट मशीन धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्याला सुरुवातीला कोरोना स्वॅब चाचणीसाठी ट्रूनेट मशीन प्राप्त झाले. त्यानंतर रॅपिड टेस्ट होऊ लागल्या. नंतर आरटीपीसीआर लॅब ...

नंदुरबार : जिल्ह्याला सुरुवातीला कोरोना स्वॅब चाचणीसाठी ट्रूनेट मशीन प्राप्त झाले. त्यानंतर रॅपिड टेस्ट होऊ लागल्या. नंतर आरटीपीसीआर लॅब मंजूर होऊन त्यात दररोज हजार ते १५०० स्वॅब चाचणी होऊ लागली. त्यामुळे जिल्ह्याला परजिल्ह्यातील लॅबवर अवलंबून राहावे लागत नसल्याची स्थिती आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात स्वॅब रिपोर्ट येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत होता. आता किमान २४ ते ४८ तासात रिपोर्ट येत असल्यामुळे रुग्णांना आणि प्रशासनालाही उपचार करण्यासाठी सोयीचे ठरत आहे.

कोरोनाच्या सुरुवातीच्या दोन ते तीन महिन्याच्या काळात सुरुवातीला पुणे येथील प्रयोगशाळेतून कोरोना स्वॅब चाचणी करावी लागत होती. नंतर धुळे येथे लॅब सुरू झाल्यावर सर्व स्वॅब धुळे येथे पाठविले जाऊ लागले. तेथेही तीन ते चार दिवस लागू लागल्यानंतर जिल्हा रुग्णालयाला ट्रूनेट उपकरण मिळाले. त्याद्वारे चाचणी होऊ लागली, परंतु त्याबाबतही समाधान न झाल्याने आरटीपीसीआर लॅब सुरू झाली आणि स्वॅब चाचणीत जिल्हा स्वयंपूर्ण झाला.

आरटीपीसीआर लॅबमध्ये एक डॉक्टर व आठ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. तीन शिफ्टमध्ये पूर्वी हे कर्मचारी काम करीत होते. आता स्वॅब संख्या कमी येऊ लागल्याने एक किंवा दोन शिफ्टमध्ये या लॅबचे काम चालते. सुरुवातीला ४८ तासात रिपोर्ट दिला जात होता. आता २४ तासात दिला जातो.

रिपोर्टबाबत तक्रारी नाहीत...

आरटीपीसीआर लॅबमधील रिपोर्टबाबत फारशा तक्रारी आल्या नाहीत. कुणी क्यूरीदेखील काढली नाही. त्यामुळे येथील कर्मचारी व अधिकारी यांच्या मेहनतीबाबत समाधान व्यक्त केले गेेले आहे. कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांच्या काळात या लॅबवर मोठा ताण होता. तीन ते चार हजार स्वॅब तपासणीसाठी येत असत. अशा वेळी तीन शिफ्टमध्ये रात्रंदिवस येथे काम चालू असे. त्यामुळे स्वॅब अहवाल लवकर मिळून रुग्णाला लागलीच उपचार करण्यासही मदत मिळत असे. आता या लॅबवरील ताण बराच कमी झाला असल्याचे दिसून येते.

ट्रूनेट उपकरण पडून

तातडीने स्वॅब अहवालासाठी सुरुवातीला जिल्हा रुग्णालयाला ट्रूनेट मशीन प्राप्त झाले होते. त्याच्या आधारे अगदीच मोजक्या चाचण्या करण्यात आल्या. नंतर आरटीपीसीआर लॅब सुरू झाल्याने त्यातच अधिक चाचण्या होऊ लागल्या. त्यामुळे ट्रूनेट हे उपकरण धूळखात पडून आहे. त्याचा यथायोग्य वापर केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

लॅबचे पुढे काय?

सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे स्वॅब तपासणीदेखील कमी झाली आहे. यापुढील काळात अगदीच अत्यल्प स्वॅब तपासणीसाठी येथे येतील. अशा वेळी ट्रूनेट उपकरणासारखी अवस्था या लॅबचीदेखील होईल अशी शक्यता आहे. अर्थात लॅबमधील उपकरणे दुसऱ्या टेस्टिंगसाठी वापरले जाऊ शकतात किंवा कसे याचीही चाचपणी सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय उपकरणाची कुठलीही वस्तू वाया जात नाही. या लॅबचाही उपयोग पुढील काळात चांगल्या कामासाठी होऊ शकतो. लॅबमधील तज्ज्ञ अधिकारी सुरुवातीला परजिल्ह्यातून आले होते. नंतर स्थानिक अधिकारी उपलब्ध झाल्याने आता लॅबमध्ये सर्वच स्थानिक अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांच्या मेहनतीचा सामान्यांकडून गौरव होत आहे.