शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात नर्मदा बचावतर्फे पुतळा दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 13:14 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  गेल्या १५ दिवसांपासून दिल्लीत भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  गेल्या १५ दिवसांपासून दिल्लीत भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी शहरातील बिरसा मुंडा चौकात नर्मदा बचाव आंदोलनाच्या वतीने काॅर्पोरेट कंपन्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र शासनाने शेतकरीविरोधी विधेयक लोकसभेत पारित केले आहे. यामुळे कृषी क्षेत्रातही काॅर्पोरेट कंपन्यांचा शिरकाव होणार आहे. केंद्र शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून, हे कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे १५ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. तरीही शासन कायदे मागे घ्यायला तयार नाही. समितीच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी तळोदा बसस्थानकाजवळील विरसा मुंडा चौकात प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. केंद्र शासनाच्या मनमानी धोरणाबाबत नाराजी व्यक्त करत तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याप्रसंगी पुण्या वसावे, ओरसिंग पटले, चेतन साळवे, लतिका राजपूत यांच्यासह  नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा शेतकरी आंदोलनास पाठिंबानंदुरबार तहसील कार्यालयासमोर   सत्यशोधक शेतकरी सभा, राज्य श्रमिक शेतकरी संघटना यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला बळ देत केंद्रसरकारविरोधात निदर्शने केली. यावेळी त्यांच्याकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सत्यशोधक शेतकरी सभा, महाराष्ट्र राज्य अमिक शेतकरी संघटना यांनी हे निवेदन दिले. नायब तहसीलदार बी.ओ. बोरसे ते स्विकारले. निवेदनात, केंद्र सरकारने पारित केलेले तिन्ही शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी विशेष संसदीय अधिवेशन बोलावून ते कायदे रद्द करावेत, शेती मालाला किमान हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, आदिवासी वनहक्क कायदा अमलात आणा, आदिवासी शेतकऱ्यांना सातबारा उतारा द्या. आदिवासी व इतर जंगल निवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करून सर्वांना सातबारा द्या. शेतक-यांवरील दडपशाही थांबवून आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या. वीज विधेयक २००२ मागे घ्या, खावटी कर्ज सरसकट द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी शेतकरी संघटनेचे विक्रम गावीत, करणसिंग कोकणी, काशिनाथ कोकणी, संजू कोकणी, फत्तेसिंग कोकणी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.लालबावटा आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे नंदुरबारात निदर्शनेनंदुरबार तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे विविध मागण्यांसंदर्भात निदर्शने करून निवेदन देण्यात आले. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून झालेल्या देशव्यापी आंदोलनांतर्गत ही निदर्शने करण्यात आली. प्रसंगी दिलेल्या निवेदनात, गेल्या १८ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास केंद्र सरकार तयार नाही, यामुळे देशातून  आंदोलनाला सक्रिय पाठिंबा म्हणून देशव्यापी धरणे आंदोलन केले आहे. शेतकरी आंदोलनाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खलिस्तानवादी, अतिरेकी, चीन व पाकिस्तानचे हस्तक असल्याचे हिणवले आहे. यातून त्यांनी शेतकरी आंदोलकांचा अपमान केला आहे. लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन करणा-यांना अशोभनीय भाषा वापरणाऱ्या रावसाहेब दानवेंचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत. दानवे यांची मंत्री मंडळातून ताबडतोब हकालपट्टी करावी तसेच केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे ताबडतोब रद्द करावे, वीज विधेयक घेत डिझेल-पेट्रोलची दरवाढ कमी करून महागाईला आळा घालावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर नथू साळवे, अरुण रामराजे, नाना ठाकरे, रामसिंग मोरे, गुंताबाई न्याहे, सोनूबाई न्याहे, वनाशीबाई भील, हिराबाई पवार यांच्या सह्या आहेत.