शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

डाबच्या उम्राणीपाड्यात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील डाबच्या उम्राणीपाडा येथे एकच हातपंप आहे. परंतु या हातपंपाला सुरूवातीपासूनच पाणी लागले ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील डाबच्या उम्राणीपाडा येथे एकच हातपंप आहे. परंतु या हातपंपाला सुरूवातीपासूनच पाणी लागले नसल्याने या पाड्यावरील नागरिकांना अर्धा किलोमीटर पायपीट करीत शेवडी जवळील नाल्याच्या झिरप्यातून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. तसेच झिऱ्यात पाणी नसले तर अडीच किलोमीटर अंतरावरील देवालपाडा, पांडीपिपरीपाडा येथील हातपंपावरून पाणी आणावे लागत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते.तालुक्यातील डाबच्या उम्राणीपाडा येथे एक हातपंप आहे. परंतु त्यास सुरूवातीपासूनच पाणी लागले नसल्याने या पाड्यांवरील नागरिकांना अर्धा किलोमीटर अंतरावरील नाल्यात शेवडी बांधावी लागली होती. मात्र या शेवडीलाही पाणी नसल्याने शेवडीला लागून झिरा तयार केला. या झिºयातूनच नागरिकांना पाणी आणावे लागत आहे. तसेच काही नागरिकांना दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या देवालपाडा, पांडीपिपरीपाडा येथील हातपंपावरून भटकंती करीत पाणी आणावे लागत आहे. दरम्याने, गुरांनाही दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पांडीपिपरीपाडा येथील तलावावर पाणी पिण्यासाठी न्यावे लागत आहे.जून व जुलै महिन्यात तर डाबच्या उम्राणीपाडा येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण होत असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. पावसाळ्यात तर नाल्याला पाणी आल्याने झिºयातील वरवरचे चांगले पाणी घेवून त्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो, असेही या नागरिकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.